ग्रामीण भागात घरे, कृषीपंपांना वीजदर सवलत, रस्तेविकासाला गती देणार पुरवणी मागणी सादर.!!!

0 186

ग्रामीण भागात घरे, कृषीपंपांना वीजदर सवलत, रस्तेविकासाला गती देणार पुरवणी मागणी सादर.!!!

मुंबई :-

ग्रामीण नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे, मुख्यमंत्री बळीराजा वीजदर सवलत योजना अंतर्गत कृषिपंप ग्राहकांना वीजदर सवलत, केंद्र योजनेअंतर्गत रस्ते व पूल प्रकल्पांसाठी बिनव्याजी कर्जासाठी निधी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना, पुणे रिंग रोड, जालना नांदेड द्रुतगती महामार्गाच्या कामांना गती, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळास बळीराजा जलसंजीवनी योजना, शासन अंशदान घटकाखाली विविध प्रकल्पांना निधी अशा लोकोपयोगी आणि राज्याच्या पायाभूत विकासाला बळकटी देण्यासाठी निधीची तरतूद असलेल्या 6 हजार 486 कोटी 20 लाख रुपयांच्या आणि निव्वळ भार 4 हजार 245 कोटी 94 लाख रुपये असलेल्या पुरवणी मागणी आज विधीमंडळात अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे.

वर्ष 2024-25 च्या पुरवणी मागण्या आज विधानसभेत सादर केल्या. सादर केलेल्या 6 हजार 486 कोटी 20 लाख रुपयांपैकी 932.54 कोटींच्या मागण्या अनिवार्य, 3,420.41 कोटींच्या मागण्या कार्यक्रमांतर्गत आणि 2,133.25 कोटी रुपयांच्या रकमा केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने सादर करण्या आल्या आहेत. 6,486.20 कोटींच्या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा 4,245.94 कोटी रुपये आहे.

असे आहेत महत्त्वाची पुरवणी मागणी

1 केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण) सर्वसाधारण व अ.ज. घटकातील लाभार्थ्यांकरिता पुरवणी मागणी 3752.16 2779.05

2 मुख्यमंत्री बळीराजा वीजदरसवलत योजना- कृषिपंप ग्राहकांना (सर्वसाधारण, अ.जा. व अ.ज. घटक) वीजदर सवलत देण्यासाठी. 2000.00 1688.74

3 केंद्र सरकारकडून राज्य शासनाला भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत रस्ते व पूल प्रकल्पांसाठी देण्यात येणाऱ्या बिनव्याजी कर्जासाठी 1450.00 लाक्षणिक

4 राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान NRLM योजनेच्या सर्वसाधारण प्रवर्गाकरिता केंद्र व राज्य हिस्स्यापोटी 637.42 लाक्षणिक

5 मुद्रांक शुल्क अनुदान – महानगरपालिका व नगरपालिका 600.00 600.00

6 राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेकरिता 375.00 257.03

7 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र हिस्सा 335.57 लाक्षणिक

8 ग्रामपंचायतींच्या रस्त्यांवरील पथदिव्यांच्या विद्युत देयकांची रक्कम, विद्युत देयकांच्या व्याज व दंडाची रक्कम महावितरणला अदा करण्यासाठी 300.00 209.55

9 राज्यातील 4 साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून महाराष्ट्र शासनामार्फत खेळत्या भागभांडवलनिर्मितीसाठी मार्जिन मनी लोन 296.00 296.00

10 पुणे रिंग रोड, जालना नांदेड द्रुतगती महामार्ग या प्रकल्पांच्या भूसंपादनाकरीता घेतलेल्या कर्जावरील व्याजाच्या परतफेडीसाठी 244.00 लाक्षणिक

11 महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीवेतन व सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी 221.89 लाक्षणिक

12 गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळास बळीराजा जलसंजीवनी योजना, शासन अंशदान या घटकाखाली विविध प्रकल्पांसाठी 175.00 लाक्षणिक

13 राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत मुळा-मुठा नदी, पुणे- प्रदुषण कमी करण्याचा प्रकल्प 171.00 103.51

14 डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाहभत्ता योजनेसाठी 150.00 150.00

15 धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान- केंद्र हिस्सा 100.00 लाक्षणिक

16 यंत्रमाग ग्राहकांना वीजदर सवलत देण्यासाठी अतिरिक्त तरतूद करणेबाबत. 100.00 लाक्षणिक

विभागनिहाय प्रस्तावित पुरक मागण्या- मार्च, 2025

अ.क्र. विभाग रक्कम (रुपये कोटीत)

1. ग्राम विकास विभाग 3006.28

2. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग 1688.74

3. नगर विकास विभाग 590.28

4. उच्च व तंत्र शिक्षण विभाग 412.36

5. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग 313.93

6. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग 255.51

7. महसूल व वन विभाग 67.20

8. इतर मागास बहुजन कल्याण विभाग 67.12

9. सार्वजनिक बांधकाम विभाग 45.35

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा