देशमुख महाविद्यालयात शनिवारी राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात शनिवारी एक दिवसीय राष्ट्रीय बहुविद्याशाखीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. ‘समकालीन समाजात सामाजिक शास्त्रांची भूमिका’ या विषयावरील या सेमिनारचे आयोजन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (आयक्यूएसी), मानव्यविद्या व वाणिज्य विद्याशाखा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय सेमिनारचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार दिलीप ओंकार वाघ असतील. डॉ. नंदकिशोर मोरे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, लखनऊ) हे बीजभाषण करतील. याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. (डॉ.) एस.टी. इंगळे, जळगाव विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. कपिल सिंघेल, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अमोल पाटील यांची विशेष उपस्थिती असेल.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संजय ओंकार वाघ (चेअरमन, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था), ॲड. महेश देशमुख (मानद सचिव), व्ही. टी. जोशी (व्हाईस चेअरमन), नानासाहेब देशमुख (संचालक), दत्तात्रय पवार (संचालक), विनय जकातदार (संचालक), विजय देशपांडे (संचालक), मनीषा पाटील (संचालक), प्राचार्य शिरीष पाटील(एम एम महाविद्यालय, पाचोरा) हे उपस्थित राहणार आहे.
राष्ट्रीय सेमिनारच्या समारोप सत्रात डॉ. प्रकाश बनसोडे (सांगोला महाविद्यालय, सांगोला, जि. सोलापूर) हे समारोपीय उद्बोधन करतील. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड असतील. या सेमिनारला प्राध्यापक, संशोधक, अभ्यासक व विद्यार्थ्यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन संयोजकांच्या वतीने प्रा.डॉ. एस.डी. भैसे, डॉ. सी.एस. पाटील, डॉ. डी.ए. मस्की, डॉ. बी. एस. भालेराव, डॉ. एस. एन. हडोळतीकर, डॉ. जी. डी. चौधरी (समन्वयक, आयक्यूएसी) यांनी केले आहे.