कर्तव्यदक्ष पोलीस कॉन्स्टेबल वसीम शेख यांना भावपूर्ण निरोप; मण्यार बिरादरीकडून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव
पाचोरा प्रतिनिधी
पाचोरा पोलीस ठाण्यात आपल्या कर्तव्यनिष्ठ, शांत आणि लोकाभिमुख कार्यशैलीने नागरिकांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण करणारे पोलीस कॉन्स्टेबल वसीम शेख यांची जळगाव येथील शनी पेठ पोलीस ठाण्यात बदली झाल्याने मण्यार बिरादरीच्या वतीने त्यांचा भावपूर्ण सत्कार करून निरोप देण्यात आला.
सेवेच्या काळात वसीम शेख यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांशी आत्मीयतेने संवाद साधत अनेकांच्या मनात आदराचे स्थान मिळविले. कोणत्याही परिस्थितीत संयम, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव जपत त्यांनी पोलीस दलाची सकारात्मक प्रतिमा समाजासमोर उभी केली. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे विविध समाजघटकांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण झाले.
त्यांच्या बदलीची माहिती समजताच मण्यार बिरादरीच्या पदाधिकारी व समाजबांधवांनी एकत्र येत त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या सेवाकार्याचे कौतुक करत जळगाव येथील नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमात मण्यार बिरादरीचे ज्येष्ठ कार्यकर्ते इरफान शेख इकबाल मण्यार, शेख रसूल शेख उस्मान, सादिक लतीफ मण्यार, सय्यद समीर सय्यद सलीम, कमरुद्दीन मण्यार, जमील सौदागर, अनिस मण्यार, सय्यद सहाम मण्यार, नसीम सौदागर यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी, “कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देणारे आणि सर्व धर्मीयांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारे अधिकारी म्हणून वसीम शेख यांची ओळख कायम स्मरणात राहील,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.





