वंचित बहुजन पदाधिकारी यांनी पाचोरा नगरपरिषद अधिकाऱ्याचे केले अनोखे सत्कार

0 133

वंचित बहुजन पदाधिकारी यांनी पाचोरा नगरपरिषद अधिकाऱ्याचे केले अनोखे सत्कार

पाचोरा  प्रतिनिधी :-

पाचोरा नगर पालिका तर्फे दि. १६/०२/२०२५ वार रविवार रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुल सभोवतालचे अतिक्रमण काढण्यात आले. यात गोर-गरीब लोकांचे अतिक्रमण काढून धनदांडग्यांना व राजकीय लोकांना पाठीशी घालण्याचे काम नगरपालिका अधिकारी यांनी केले आहे. कारण महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाने १००% अनुदानावर गटई कामगारांसाठी मोफत पत्र्याचे स्टॉल देऊन उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून दिलेले आहे. परंतु पाचोरा नगर पालिका अधिकारी यांनी कशल्याच प्रकारची पूर्व सूचना न देता व नियोजित जागा उपलब्ध न करता काही गटई स्टॉल धारकांचे अतिक्रमण म्हणून स्टॉल काढले व काही उपस्थित नसल्याने त्यांचे स्टॉल जप्त करून घेतले. करिता आज रोजी या गटई स्टॉल धारकांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे पत्र वंचित बहुजन आघाडी ता. अध्यक्ष विशाल बागुल यांना देण्यात आहे.

या करिता वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व गटई सर्व स्टॉल धारक पाचोरा नगर परिषद कार्यालयात जाऊन सहाय्यक अधिकारी सोनवणे साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन अतिक्रमण काढल्या बद्दल अभिनंदन केले. परंतु या सर्व गटई स्टॉल धारकांना नियोजित जागा उपलब्ध करून देण्यात यावी करिता चर्चा केली आणि २०२२ पासून तक्रार येत असलेले रेल्वे स्टेशन मेन गेट जवळील जुना जकात नाका सभोवतातील अतिक्रमण ही पाचोरा नगर पालिका लवकरच काढेल अशी आशा वेक्त केली.

या वेळेस वंचित बहुजन आघाडी पाचोरा तालुका अध्यक्ष विशाल बागुल, दिपक परदेशी, मुस्ताक शेख, एजाज पिंजारी, आकाश पवार, दिपक सोनवणे, गुरुलाल पवार, व पाचोरा शहरातील सर्व गटई स्टॉल धारक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा