बाळद रोडवरील मोटर सायकल चोरी प्रकरणी १ आरोपी भडगाव पोलिसांच्या ताब्यात; २ मोटर सायकल हस्तगत.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
तालुक्यातुन व शहरातून गेल्या काही दिवसांपासून अनेक दुचाकी चोरीला जात आहेत. याबाबत भडगाव पोलिसांनी वडजी येथील एका तरुणाला मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेली असून या दुचाकी चोराकडून दोन दुचाकी हस्तगत करण्यात भडगाव पोलिसांना यश आले आहे.
याबाबतदि.२४/०१/२०२५ रोजी सकाळी १०.०० ते १२.०० वा. सुमारास भडगाव शहारातून बाळद रोड येथील फिर्यादी यांच्या महाराष्ट्र बॅटरी नावाच्या दुकानासमोरुन फिर्यादीची १० हजार रुपये किमतीची एक बजाज कंपनीची सी.टी. १०० लाल रंगाची मोटार सायकल क्र. एम.एच.१९.ए.एन.१०९६ तिचा चेचीस नं. १७५७७ इंजिन नं. ४५२४३१ अशी नंबर असलेली मोटार सायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे संमतीवाचून लबाडीचे इराद्याने चोरुन नेली. म्हणुन फिर्याद वरुन भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नं. ५८/२०२३ बी.एन.एस. कलम ३०३ (२) प्रमाणे फिर्यादी शेख मुनाफ शेख युसुफ (वय ३५, रा.हकीन नगर, भडगाव) यांचे फिर्यादवरुन अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भडगांव पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सदर गुन्ह्यातील मोटार सायकल ही सत्यपाल दत्तात्रय निकम रा.वडजी ता.भडगाव याने चोरुन नेली.भडगाव पोलिसांनी सदर आरोपीला ताब्यात घेतले.आरोपीकडे गुन्ह्यात चोरीस गेलेली मोटर सायकल बाबत विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर आरोपीने पाच गुन्हे केल्याची कबूल दिली असून त्यास सदर गुन्ह्यात दि.१७/०२/२०२५ रोजी
अटक करण्यात येवून आरोपी हा पोलीस कस्टडीमध्ये असतांना आरोपीकडे विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्ह्यात चोरी केलेली मोटर सायकल चोरी केल्याची कबुली दिली. तसेच अटकेत असतांना इतर ठिकाणावरुन अजुन एक मोटर सायकल अशा दोन मोटर सायकल चोरी केल्याची पोलीस कस्टडीमध्ये कबुली दिल्याने सदरच्या मोटर सायकली चोरीच्या गुन्ह्यात आरोपीने काढून दिल्याने त्या जप्त करण्यात आलेल्या आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, चाळीसगाव परिमंडळ, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल चाळीसगाव उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, स.फौ. प्रदीप चौधरी, पोहेकी निलेश ब्राम्हणकर, पोको सुनिल राजपूत, पोको प्रविण परदेशी यांनी केली असून गुन्हाचा पुढील तपास सफौ प्रदीप चौधरी हे करीत आहेत.