पंकज साखरे यांना राज्य बालनाट्य स्पर्धेत प्रथम

0 47

पंकज साखरे यांना राज्य बालनाट्य स्पर्धेत प्रथम

पंकज साखरे यांना राज्य बालनाट्य स्पर्धेत प्रथम.पारितोषिक. भुसावळ – 21 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत महाराणा प्रताप विद्यालयाचे कलाशिक्षक तथा कला शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष पंकज साखरे यांना राज्यातून सर्वोत्कृष्ट रंगभूषा साठी प्रथम क्रमांक मिळाला. 

दि. १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी, २०२५ या कालावधीत स्वा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे अतिशय जल्लोषात झालेल्या बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकूण ३२ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले.त्यात भुसावळ येथील महाराणा प्रताप विद्यालयाने झेप नाटकाचे सादरीकरण केले. त्या नाटकात रंगभूषा पंकज साखरे यांनी केली होती त्यासाठी त्यांना राज्यातून प्रथम क्रमांक मिळाला 

 स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. संतोष आबाळे, श्री. गिरीष भुतकर, श्री. राजेश जाधव, श्री. संग्राम भालकर, श्रीमती राधिका देशपांडे यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

 

सांस्कृतिक कार्य मंत्री अॉड. आशिष शेलार यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या बालनाटकांच्या संघांचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. राज्य स्पर्धेत रंगभूषेसाठीच प्रथम पारितोषिक मिळून भुसावळ शहराचे उज्वल केल्याबद्दल भुसावळ चे आमदार राज्याचे वस्त्रउद्योगमंत्री नामदार संजय सावकारे , संस्थेचे बापूराव मांडे , संस्थेचे अध्यक्ष सोनू मांडे,व सर्व पदाधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे ,डी. बी.धाडी, तुषार प्रधान, मुख्याध्यापक सुरेश शिंदे, महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघाचे सचिव तथा जिल्हाध्यक्ष एस.डी. भिरूड ,महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ.प्रदीप साखरे , तसेच भुसावळ व जिल्हा नाट्य क्षेत्रातील विविध मान्यवरांनी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा