लाडक्या बहिणींसाठी गूड न्यूज.-आठ दिवसात मिळणार 1500 रुपये
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. फेब्रुवारी महिन्यातील हप्त्याची रक्कम लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
पुढील आठ दिवसांत लाडक्या बहिणींच्या खात्यात आठव्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे. लाडक्या बहिणी फेब्रुवारी महिन्याचा हप्त्या कधी जमा होणार याच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु आता पुढील आठ दिवसात हे पैसे खात्यात जमा होणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चार दिवसांपूर्वी जालना दौऱ्यावर असताना लाडक्या बहिणींचा पुढील हप्ता आठ दिवसात जमा होईल असे सांगितले होते. परंतु अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. फेब्रुवारी महिना 28 दिवसांचाच आहे. त्यामुळे पुढील आठ दिवसात फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आहे. 3 मार्चपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत सरकार त्याआधीच लाडक्या बहिणींना आठवा हप्त्याचे 1500 रूपये जारी करू शकते.
लाडकी बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुरू
लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची तपासणी सुरु आहे. आतापर्यंत 5 लाखांहून अधिक अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. निकषांची पात्रता न करणारे अर्ज सरकारकडून बाद केले जात आहेत. मराठवाड्यातील 55 हजाराहून अधिक महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे आता या सर्व अपात्र महिलांना पुढील हप्त्याची रक्कम मिळणार नाही. या योजनेत आतापर्यंत 7 हप्त्यांची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.
लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता
लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी डिसेंबरपासूनच सुरु करण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये 2 कोटी 46 लाख महिलांना लाभाची रक्कम पाठवण्यात आली होती, परंतु जानेवारीत हा आकडा 2 कोटी 41 लाख एवढा होता. म्हणजेच यातील 5 लाख लाभार्थी महिलांची संख्या कमी झाली. आता फेब्रुवारीत लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
लाडक्या बहिणींसाठी नवे नियम
लाडकी बहिणी योजनेत नियमितता आणि पारदर्शकता आणण्यासाठी सरकारकडून नव्या नियम लागू केले जाणार आहेत. या नियमानुसार प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात हप्ता मिळेल. तसेच लाभार्थी महिलांना बँकेत दरवर्षी जून-जुलै महिन्यांत ई-केवायसी करावे लागेल. याशिवाय योजनेत कायम राहण्यासाठी हयातीचा दाखला देखील सादर करावा लागेल. ही प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ कायम मिळत राहणार आहे.
अधिवेशनात मिळणार गूड न्यूज
विधानसभा निवडणूकीपूर्वी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिल्या जाणारी रक्कम 1500 वरून 2100 कण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर बजेटमध्ये यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल असे म्हटले होते. आता 10 मार्च रोजी अर्थमंत्री अजित पवार राज्याचे बजेट सादर करणार आहे. या बजेटमध्ये यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे.