भडगाव येथे चारचाकी वाहनाचा धुमाकुळ. कर्तारसिंग परदेशी बाल बाल बचावले. वाहनधारकाची धुम.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
शहरातील लक्ष्मीनगरातील रहिवाशी शेतकरी कर्तारसिंग मच्छिंद्र परदेशी हे शेतातुन घराकडे येत असतांना या सिंलेंडर वाहतुक करणार्या चालकाने रस्त्यावर अंदाधुंद गाडी चालवुन रस्त्यावर नियमानुसार व कमी वेगात चालणार्या कर्तारसिंग परदेशी हे बाल बाल बचावल्याची घटना घडली आहे. माञ पोलीस स्टेशनची या घटनेची वार्ता देऊनही हा गाडी चालक भडगाव बसस्थानक परीसर, कजगाव, चाळीसगावच्या दिशेने रवाना झाला आहे. या घटनेतुन मी बाल बाल बचावलेलो आहे. अजुन काही जणांचा अपघातात मृत्युला कवटाळण्याची वेळ होती. माञ मी सतर्कतेनुसार कसा वाचलो हेच मला कळत नाही. परंतु माझ्यासह अजुनही काही जणांचे जीव गेले असते. तरी पोलीसांनी शहरातील सीसीटिव्ही कॅमेरे तपासुन संबंधित अंदाधुंद वाहन चालकावर कायदेशीर कार्यवाही करावी. अशी मागणी कर्तारसिंग मच्छिंद्र यांनी केली आहे . याबाबत माहिती अशी कि, भडगाव शहरातील लक्ष्मीनगरातील रहिवाशी शेतकरी यांचे शेत भडगाव पाचोरा रस्त्यावर क्रिडासंकुलासमोर आहे. ते आपल्या सालदारांसह शेती कामे करुन भडगावकडे परत जात असतांना मास्टरलाईन आईल कंपनीसमोरुन याच भागात रस्त्यावरुन करतारसिंग मच्छिंद्र परदेशी सायंकाळी ५ वाजे दरम्यान पाचोरा रोड वरील शेताकडून भडगावच्या दिशेने निघालो असता मास्टर लाईन ऑइल समोर चालत असताना मागुन येणाऱ्या गॅस सिलेंडरची गाडी यावरून चालकाने आम्हाला उडवण्याचा प्रयत्न केला .
वेळीच गाडीच्या साईड मिरर मध्ये लक्ष गेल्याने या अपघातातुन मी बाल बाल बाचवलो. हा प्रसंग कोणासोबत घडू नये. यासाठी मी गाडी बाबतचा नंबर व त्याची तक्रार भडगाव पोलीस स्टेशनला संपर्क करून त्यांना भ्रमणध्वनीद्वारे दिली. त्या गाडीवाला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात काही यश मिळालं नाही. तो भडगाव पारोळा चौफुली क्रॉस करून चाळीसगावच्या दिशेने निघुन गेला. बहुदा तो दारूच्या किंवा कोणत्यातरी नशेत असावा असा माझा अंदाज आहे. कारण आम्ही शेतात जातांना दिवसा वा राञी नेहमी ये जा करतो.
परंतु या वाहनधारकाचा विषय चित्तथरारक अन जीव घेणा दिसुन आला. शहरात ठिक ठिकाणी सी सी टीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. तरी भडगाव पोलीसांनी या मगरुर अन अंदाधुंद स्थितीत वाहन चालवुन जीव घेण्याचा प्रयत्न करणार्या चालकाचा शोध घ्यावा. रीतसर कार्यवाही करावी. जेणेकरुन रस्त्यावर शिस्तीत वापरणार्या वाहनधारक व नागरीकांच्या जीवघेणा घटना घडणार नाहीत. अशी आमची मागणी आहे अशी माहीती दै. लोकमतशी बोलतांना कर्तारसिंग परदेशी यांनी दिली. कर्तारसिंग परदेशी हे वाडे येथील रहिवाशी आहेत तर भडगावचे माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी यांचे शालक आहेत.