म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी.!!!
भुसावळ प्रतिनिधी :-
नगर परिषद संचालित. म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस. जी. मेढे हे होते. सदा प्रसंगी शाळेच्या सेवाजेष्ठ शिक्षिका सरला सावकारे , शालिनी बनसोडे, डॉ. प्रदीप साखरे , डि.के. भंगाळे, एस.टी. चौधरी, एन .एच.राठोड, नाना पाटील, मनोज किरंगे, प्रवीण चौधरी, जे.पी. शिरतुरे, आर.पी. सोनवणे, पूनम देवकर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
प्रथम शाळेचे शिक्षक नाना बाजीराव पाटील व वरीष्ठ लिपिक प्रवीण चौधरी यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. मुख्याध्यापक व उपस्थित सर्व शिक्षक ,
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. अध्यक्ष भाषणात ए.जी.मेढे शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याबद्दल विस्तृत माहिती सांगितली. शिवाजी महाराज हे किती आदर्श व नीतिमान राजे होते, आपल्या रयतेची ते किती काळजी घेत असायचे, आचारसंहितेचे पालन करताना ते आपला आणि परका असा कुठल्याच प्रकारचा भेदभाव न बाळगता जो रयतेसाठी चांगलं कार्य करत असायचा त्याला ते बक्षीस देत असायचे, व जो चुकीचे काम करत असायचा त्याची शहानिशा करून त्याला ते शिक्षा देत असायचे, स्त्रियांच्या प्रती त्यांच्या मनात नितांत आदर होता हे पटवून देताना त्यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचे उदाहरण सांगितले, तसेच आपल्या राज्यात जर चुकीचे काम केले तर त्याला काय शिक्षा होत होती हे सांगताना त्यांनी त्यांच्या एका सरदाराचे उदाहरण देताना सांगितले की, त्यांच्या एका सरदाराने एका मुलीवर बलात्कार केला तेव्हा त्यांनी त्यांच्या तो जवळचा जो सरदार होता, त्याचे हातपाय तोडले व जीवनभर त्याला अपंग बनवले अशी शिक्षा केली,
आपला एक सरदार बंगरुळला गेल्यावर त्याने तेथील राज्य मिळवण्या साठी सावित्री देसाई नावाच्या एका स्त्रीशी महिनाभर युद्ध केले त्यात तो जिंकला सुद्धा परंतु त्याने चुकीचे काम करून त्या स्त्रीची इज्जत लुटली तेव्हा त्यांच्या डोळ्यात सळया घालून कायमचे अंधत्व करा अशा प्रकारची शिक्षा त्याला ठोठावण्यात आली राज्य करत असताना ते कधीच भेदभाव करत नव्हते ते मोघलांच्या विरोधात लढले परंतु त्यांनी कधीच मुसलमानांच्या मज्जीदी किंवा दर्गे तोडले नाही, सर्वधर्मसमभावाचे तत्व त्यांनी अवलंबले, परकीय स्त्री असेल मग ती कोणत्याही धर्माची असो त्यांनी तिला आई बहिणी प्रमाणे वागवले. आपल्या शौर्याच्या साह्याने त्यांनी शाहिस्तेखान, अफजल खान,
मिर्झा राजे जयसिंग यांना धडा शिकवला, शेतकऱ्यांच्या शेतातील काडीला सुद्धा धक्का लागणार नाही इतकी खबरदारी ते शेतकऱ्यांच्या प्रती घेत होते, आपल्या सैन्यातील कोणी एक सैनिक हा आपल्या राज्यातील रयतेवर अत्याचार करणार नाही याची सुद्धा ते काळजी घेत असायचे. एक आदर्श राजा की ज्याला ज्याच्या आईने लहानपणापासूनच स्वराज्याचे बाळकडू पाजले, आणि मोठे झाल्यावर मावळ प्रांतातील सर्व मावळ्यांना एकत्र करून त्यांनी आपणास स्वराज्य मिळवून दिले,
त्यांनी मिळवलेल्या स्वराज्य तर होतेच परंतु ते सुराज्य होते, त्यांच्या राज्यात सर्वांना मानपान,आदर,सन्मान मिळत होता म्हणूनच त्याला रयतेचे राज्य असे संबोधले जात असायचे.अशा प्रकारची विस्तृत माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र राठोड यांनी केले. आभार डॉ. प्रदीप साखरे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वी साठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.