क्राईमजळगावमहाराष्ट्र

पाचोरा शहरात किरकोळ कारणावरून एका २० वर्षीय तरुणावर चाकुने वार करत खून.!!!

पाचोरा शहरात किरकोळ कारणावरून एका २० वर्षीय तरुणावर चाकुने वार करत खून.!!!

संशयित अटकेत पाचोरा शहरातील घटना. •••

पाचोरा प्रतिनिधी : –

शहरात किरकोळ कारणावरून २० वर्षीय तरुणावर चाकुने वार करत खुन केल्याची घटना शहरातील बाहेरपुरा भागात मध्यरात्री १२:३० वाजता घडली. घटनेतील मारेकऱ्यास पाचोरा पोलिसांनी जेरबंद केले आहे. या घटनेप्रकरणी मारेकऱ्याविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन दिनांक १८ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. १२ १५ मिनिटांनी मिरवणूक

वाजुन संपल्यानंतर हेमंत संजय सोनवणे (वय २०, रा. जुना माहेजी नाका, महात्मा फुले नगर, पाचोरा) यास शहरातील बाहेरपुरा येथे संशयीत आरोपी रोहित गजानन लोणारी (वय २०, रा. शिव कॉलनी, पाचोरा) याने किरकोळ कारणावरून धारदार चाकूने पोटात वार करुन घटना

स्थळावरून पसार झाला.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अशोक पवार व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल होवुन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हेमंत सोनवणे यास तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेमंत सोनवणे हा गंभीर जखमी असल्याने त्यास जळगाव येथे उपचारार्थ हलविण्यात आले. तर हेमंत सोनवणे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रोहीत लोणारी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये रोहित लोणारी यांच्या विरुध्द खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असुन घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार हे करीत आहे. रोहित लोणारी याने हेमंत सोनवणे याचा खुन का केला ? याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!