तंबाखू न खाणाऱ्यांनाही होऊ शकतो ओरल कॅन्सर.!!!
आतापर्यंत आपण ऐकले आहे की फक्त तंबाखू सेवन करणाऱ्यांनाच तोंडाचा कर्करोग होतो. पण आता एका नवीन अभ्यासातून एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. या अभ्यासातून असे दिसून आले आहे की जे लोक तंबाखूचे सेवन करत नाहीत त्यांनाही तोंडाच्या कर्करोगाचा धोका असतो.
ओरल कॅन्सर, ज्याला तोंडाचा कर्करोग देखील म्हणतात. तो तोंडाच्या किंवा घशाच्या मागील भागात असामान्य पेशींची अनियंत्रित वाढ आहे. हे डोके आणि मानेच्या कर्करोगात सामील आहे.
भारतात ओरल कॅन्सरच्या रुग्णांची संख्या लक्षणीय रित्या वाढत आहे, विशेषत: ज्या व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांना ओरल कॅन्सर नाही अशा लोकांमध्येही सध्या ओरल कॅन्सरच्या समस्या दिसून येत आहेत.
एका संशोधनात झालेल्या अभ्यासानुसार,अलिकडच्या काळात आढळलेल्या ओरल कॅन्सरच्या 57 टक्के रुग्णांमध्ये तंबाखू सेवनाचा कोणताही इतिहास नसलेले रूग्णदेखील होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे लोक दारूही पित नव्हते. म्हणजे,अशा निर्व्यसनी लोकांमध्येही कर्करोगाचे प्रमाण आढळून आले आहे.
डॉक्टरांच्या अभ्यासात आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. संशोधनात असे आढळून आले की बाधित व्यक्तींपैकी 75.5 टक्के पुरुष होते, तर 24.5 टक्के महिला होत्या. याचा अर्थ असा की जे पुरुष तंबाखू किंवा अल्कोहोलचे सेवनही करत नव्हते त्यांनादेखील ओरल कॅन्सरने ग्रासले होते.
संशोधनात आढळलेले ओरल कॅन्सरने ग्रस्त असलेले लोक तंबाखू आणि दारूचे सेवन करत नव्हते. हे पाहून डॉक्टरांना खूप आश्चर्य वाटले. कारण आतापर्यंत असे म्हटले जात होते की तोंडाचा कर्करोग फक्त तंबाखू आणि दारूच्या सेवनामुळे होतो. संशोधनात असेही नमूद केले आहे की 58.9 टक्के रुग्णांना सौम्य संसर्ग होता, तर 30 टक्के रुग्णांना अनेक गंभीर आजारांनी ग्रासले होते. सध्या, डॉक्टर या संशोधनाचा अधिक अभ्यास करत आहेत जेणेकरून त्यांना तोंडाच्या कर्करोगामागील कारण काय आहे हे कळू शकेल.
निरोगी आहार
योग्य आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे.
फळे, भाज्या, अन्नधान्य, पोषणयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा लागतो.
तोंडाची स्वच्छता
नियमितपणे दात घासणे आणि फ़्लॉस करणे आवश्यक आहे.
तोंड नीट स्वच्छ धुवावे.
नियमित चेकअप
वर्षांतून कमीत कमी एकदा तरी डेंटिस्टकडून तोंडाची तपासणी करून घ्यावी.