कजगाव येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सवात साजरी.!!!
भडगाव ता प्रतिनिधी :-
कजगाव संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्ताने संत रविदास महाराज यांची पालखी मिरवणूक व श्री.श्री.१००८ महामंडलेश्वर पूजा माई नंदगिरी यांची भव्य मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली
कजगाव येथील मुळ रहिवासी व नशिक येथे स्थायिक झालेल्या पूजा माई नंद गिरी यांना नुकतीच प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभ मेळ्यात महामंडलेश्वर ही मानाची पदवी किन्नर आखाड्याच्या वतीने बहाल करण्यात आल्याबद्दल कजगाव ग्रामस्थांच्या व चर्मकार समाजाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला
कजगाव येथील मुळ रहिवासी असलेल्या व मोठे नावलौकिक मिळविलेल्या पूजा माई यांना अध्यात्मिक क्षेत्रात अत्यंत महत्वाची आणि मानाची पदवी असलेल्या महामंडलेश्वर सारख्या महत्वाच्या सन्मानाने सन्मानित केल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे सदरील सन्मान हा किन्नर आखाड्याचे आचार्य श्री श्री १००८ महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मीनारायण त्रिपाठी.हरी गिरिजी महाराज,बापू महाराज, महेंद्र गिरीजी महाराज, सह असंख्य साधू संताच्या उपस्थितीत त्यांच्या सामाजिक आणि अध्यात्मिक कार्याची अनेक वर्षांपासून अविरत चालत असलेली समाजसेवेची दखल घेवून किन्नर आखाड्याच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला
तसेच संत रविदास महाराज यांच्या जयंती चे अवचीत्य साधून संपूर्ण गावभर महामंडलेश्वर पूजा माई नंद गिरी यांची बग्गीतून मिरवणूक काढून त्यांचा सन्मान करण्यात आला
तसेच संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्ताने गावात संत रविदास महाराज यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली व नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी महामंडलेश्वर पूजा माई नंदगिरी चर्मकार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष नाना मोरे, समाधान पाटील, अनिल महाजन, अनिल टेलर, गडबड बोरसे, रवी साठे, बी.के पाटील, वसंत शिनकर डॉ. रवींद्र पाटील, संजय पाटील,वाल्मीक मोरे, यशवंत मोरे, सुनील मोरे, दगडू मोरे , युवराज मोरे, धुडकू सोनवणे, असंख्य ग्रामस्थ व चर्मकार समाज बांधव.मोठ्या संख्येने उपस्थित होते