गोंडगाव विदयालयात दहावीच्या विदयार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षिस वितरण समारंभ.!!!

0 136

गोंडगाव विदयालयात दहावीच्या विदयार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षिस वितरण समारंभ.!!!

भडगाव प्रतिनिधी :—

चाळीसगाव येथील रा. स. शि. प्र. मंडळ संचलीत गोंडगाव माध्यमिक विदयालयातील दहावीच्या विदयार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षिस वितरण समारंभ कार्यक्रम दि.११ रोजी सकाळी आयोजीत करण्यात आला होता. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी विदयालयाचे मुख्याध्यापक कल्याणराव वाघ हे होते. सुरुवातीस सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करुन माल्यार्पण करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक एस. आर. पाटील यांनी केले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, रंगभरण स्पर्धा , इंटरमिजीएट परीक्षा , इलीमिंटरी परीक्षा, क्रिडा स्पर्धा आदि स्पर्धांचे प्रमाणपञ विदयालयाचे मुख्याध्यापक कल्याणराव वाघ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांच्या हस्ते विदयार्थ्यांना वितरीत करण्यात आले. तसेच यावेळी विदयार्थी, विदयार्थीनी, शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच दहावीच्या विदयार्थ्यांनी शाळेला भेट वस्तु दिल्या. कार्यक्रमाचे सुञसंचलन किर्ती पाटील, मानसी पाटील या विदयार्थीनींनी केले होते. आभार रमजान शहा या विदयार्थ्यांनी मानले.

 

यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक कल्याणराव वाघ, पी. व्हि. जाधव, सी. एस. सोन्नीस, एस. डी. चौधरी, एस. आर. पाटील, एस. वाय. पाटील, पी. व्हि. सोळंके, आर. एस. सैंदाणे, एस. आर. महाजन, पी. जे. देशमुख, एस. जी. भोपे, ए. एम. परदेशी, एस. एल. मोरे, व्ही. एम. जाधव आदि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी, विदयार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा