मुस्लिम कुटुंबाची लग्नपत्रिका, वाचूनच पाहुण्यांना भरली धडकी, लग्नाला जायची वाटतेय भीती.!!!

0 41

मुस्लिम कुटुंबाची लग्नपत्रिका, वाचूनच पाहुण्यांना भरली धडकी, लग्नाला जायची वाटतेय भीती.!!!

नवी दिल्ली :-

गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये लाखो विवाह झाले. या वर्षीही जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये लग्नांची मालिका सुरूच आहे. लग्नाच्या निमित्ताने कार्ड्स खूप महत्त्वाची भूमिका बजावतात, म्हणूनच लोक लग्नाच्या कार्ड्सवर खूप पैसे खर्च करतात आणि त्यांच्या कुटुंबाचे कार्ड इतरांच्या कार्ड्सपेक्षा चांगले बनवण्याचा प्रयत्न करतात.

कधीकधी लग्नाच्या कार्डमध्ये नमूद केलेल्या गोष्टी देखील मनोरंजक बनतात. सध्या अशीच एक लग्नपत्रिका सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे.

एका मुस्लिम कुटुंबातील मुलाची ही लग्नपत्रिका आहे. मुलाच्या कुटुंबाने ही लग्नपत्रिका त्यांच्या पाहुण्यांना वाटली. लग्नपत्रिकेत असं काहीतरी लिहिलं होतं की ते वाचल्यानंतर सगळ्यांना धडकी भरली आहे. लग्नाला जायची भीती वाटते आहे.

फैक अतीक किदवई या फेसबुक पेजवर ही लग्नाची पत्रिका पोस्ट करण्यात आली आहे. हे लग्न ,9 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. लग्न जयपूरमध्ये होत आहे. जयपूरमधील करबला मैदानावर हे लग्न होणार आहे. या कार्डमध्ये 8 आणि 9 फेब्रुवारीच्या कार्यक्रमांची माहिती आहे. काही भागांवर पांढरा रंग लावला आहे, ज्यामुळे ते वाचता येत नाहीत.

कार्डमधील इतर सर्व काही सामान्य आहे, परंतु लोकांचे लक्ष एका भागाकडे जात आहे. कार्ड्समध्ये काही पाहुणे, नातेवाईकांना आग्रहाचं निमंत्रण दिलं जातं, त्यांची. उपस्थिती महत्त्वाची समजली जाते. तो हा भाग. या लोकांमध्ये बहुतेकदा वधू किंवा वराचे काका काकी, मामा मामी, आत्या इत्यादींचा समावेश असतो.

पण या लग्नाच्या कार्डमध्ये दर्शनाभिलाषीऐवजी मृतांची नावं टाकण्यात आली आहेत. कार्डवर लिहिलं आहे, स्वर्गीय नूरुल हक, स्वर्गीय लालू हक, स्वर्गीय बाबू हक, स्वर्गीय एजाज हक. यानंतर जिवंत लोकांची नावं लिहिली आहेत.

हे कार्ड व्हायरल होत आहे. लोकांनी कमेंट केल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिलं, जोधपूर आणि जयपूरमधील लोकांमध्ये असे कार्ड छापणं सामान्य आहे. एकाने म्हटले, मेजवानी करबलाच्या मैदानात आहे, म्हणून त्यांनी योग्य कार्ड छापले आहे. ज्याने त्याच्या सोशल मीडियावर हे कार्ड पोस्ट केलं त्याने आपण या लग्नाला जाणार नसल्याचं म्हटलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा