जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल वार्षिक स्नेहसंमेलन २०२४-२०२५संपन्न.!!!
पाचोरा प्रतिनिधी :-
जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत २०२४ – २०२५ या शैक्षणिक वर्षातील वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक ८ फेब्रु २०२५ वार शनिवार रोजी सायं मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव लोकसभेच्या विद्यमान खासदार श्रीमती. स्मिताताई वाघ, जिल्हा परिषद सदस्य तथा बीजेपी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष मधुकरभाऊ काटे, बीजेपी जळगाव जिल्हा कोषाध्यक्ष कांतीलालभाऊ जैन, बीजेपी माजी शहराध्यक्ष तथा जिल्हा परिषद कार्यकारणी सदस्य नंदूभाऊ सोमवंशी, अमळनेर तालुका सरचिटणीस महेंद्र पाटील, बीजेपी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाटील, अमळनेर विधानसभा विस्तारक राकेश पाटील, युवा मोर्चा पदाधिकारी शुभम पाटील इ.मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन तथा द्वीपप्रज्वलन खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वर्ग 6 वी विद्यार्थिनींनी गणेश वंदना सादर केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण होते आणि शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे प्रदर्शन या भव्य सोहळ्यातून दिसून आले. भाव साक्षरता वैज्ञानिक दृष्टिकोन, अध्यात्मिक जागरण, गोंधळ, गोपाळकाला, देशभक्तीवर गीत आदी गीतांवर सामूहिक नृत्य सादर करून आलेल्या पाहुण्यांचे व पालकांची मने जिंकली. तसेच मोबाईल व बाह्य खाद्यपदार्थांपासून मुलांना दूर ठेवण्याचा संदेश त्यांनी पालकांना दिला. तसेच राष्ट्रीय जबाबदारी, वाहन विवेक, निसर्गाबाबतची कृतज्ञता, ध्येयनिश्चिती या समाजमन घडवणाऱ्या विषयांवर मुलांनी सुंदर सादरीकरण केले. हे स्नेहसंमेलन केवळ नाट्य, नृत्य यांचा अविष्कार न राहता ते विचारांचे संमेलन बनले. हे संमेलन अंतर्मुख करणारे होते. असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. दिनेशजी बोथरा, उपाध्यक्ष श्री. गिरीषजी कुलकर्णी, सचिव श्री. जीवनजी जैन, सहसचिव श्री. संजयजी बडोला, खजिनदार श्री.जगदीशजी खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन श्री. लालचंदजी केसवाणी, स्कूल कमिटी सचिव श्री. रितेशजी ललवाणी तथा सर्व संचालक मंडळ यांच्या आदेशाने तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पुष्पलता पाटील व सीईओ श्री.अतुल चित्ते सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय स्नेहसंमेलन संपन्न झाला . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री किरण बोरसे सर व वर्ग ८वी विद्यार्थिनी कु. अनुष्का पाटील व भूमिका पाटील तसेच ९वी तील विद्यार्थिनी कु.कनिष्का जैन,तनिषा माळी,श्रद्धा पाटील, अक्षरा पांडे यांनी उत्कृष्टरित्या सादर केले. व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.प्रतिभा मोरे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.