नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीत महिलेचा बँकेच्या दारातच मृत्यू.!!!

0 55

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीत महिलेचा बँकेच्या दारातच मृत्यू.!!!

नाशिक प्रतिनिधी :-

नाशिक जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा लाडक्या बहीण योजनेला मोठा धक्का लागला असून पैसे काढण्यासाठी आलेल्या महिलेचे रांगेत उभे राहिल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना दिंडोरी तालुक्यामध्ये घडली आहे.

राज्य शासनाने सुरू केलेल्या लाडक्या बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला त्यामुळे राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचे सरकार हे विराजमान झाले हे सर्व घडत असताना आता लाडक्या बहीण योजनेतील बहिणीला अजूनही सरकारी त्रास हा सहनच करावा लागत आहे असाच काहीसा प्रकार नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे घडला आहे. त्यामुळे या योजनेला नाशिक जिल्ह्यामध्ये मोठा धक्का बसला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की नासिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यामध्ये असलेल्या उमराळे येथे महाराष्ट्र शासनाची लीड बँक असलेल्या महाराष्ट्र बँकेत ही दुर्दैवी घटना घडली आहे या उमराळे शाखेला आजूबाजूचे सुमारे चाळीसगाव जोडले गेले असून या बँकेमध्ये सातत्याने गर्दी असते कारण आजूबाजूच्या परिसरामध्ये दुसरी सरकारी बँक नाही आहे आणि ज्या सरकारी बँकेच्या शाखा आहेत त्या सर्व दिंडोरी गावात आहेत.

 

या बँकेमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे त्यामुळे सातत्याने बँकेमध्ये गरजेचे प्रमाण हे कायमच असते आज शनिवारी नेहमीप्रमाणे बँक चालू होती आणि त्यावेळी सुलभा भाऊराव लहानगे ( आळंदी डॅम) ही गर्भवती महिला आपल्या लाडक्या बहीण योजनेचे जमा झालेले पैसे काढण्यासाठी म्हणून आली होती. तसेच या महिलेला आपल्या बँक खात्यातील केवायसी देखील करावयाची होती.

 

पण बँकेमध्ये नेहमीप्रमाणे गर्दी होती त्यामुळे या महिलेला रांगेत उभे राहावे लागले रांग खूप मोठी होती आणि डोक्यावरती ऊन देखील होते त्यामुळे काही काळानंतर या सुलभा लहानगे ला चक्कर आली आणि ती तिथेच पडली त्यामुळे रांगेत उभे असलेल्या नागरिकांनी तिला तातडीने बाजूला करून मदत केली पण डॉक्टरही येण्यास विलंब झाल्याने या महिलेचा बाळासह मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेला मोठा धक्का लागला असून सरकारी यंत्रणेच्या हलगर्जीपणाचा हा एक बळीच गेला आहे अशी भावना उमराळे व आजूबाजूच्या नागरिकांमध्ये पसरली असून त्यांनी संताप व्यक्त केला जात असून महाराष्ट्र बँकेने या महिलेला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही महिला निराधार असून तिला दोन मुले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!