भडगाव शहरातील अँग्लो उर्दू हायस्कुलमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.!!!
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
भडगाव शहरातील अँग्लो उर्दू हायस्कुलमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.!!!
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव शहरातील अँग्लो उर्दू हायस्कुलमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य, नाटकं आणि भाषणं सादर केली. विद्यार्थ्यांनी आपल्या देशाच्या इतिहासाची आणि संस्कृतीची माहिती दिली. कार्यक्रमात अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाचे कौतुक केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली. या कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी आपल्या देशाच्या प्रती प्रेम आणि आदर व्यक्त केला.
या कार्यकमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक मिर्झा नाजीम सर यांनी केले होते कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शिक्षक शेख अजीम सर, अशपाक कुरेशी सर, रहीम सर, दानिश आलम सर, अब्दुल कादिर सर, शेख अझरुद्दीन सर, वसीम खान सर,अश्फाक पिंजारी शिक्षिका शगुफ्ता खान, शगुफ्ता शेख यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन अशफाक कुरेशी यांनी केले तर आभार रहीम बागवान सर यांनी मानले.