मोठी बातमी– तर. थेट वाहनच होणार जप्त’, पोलीसांनी दिल्या महत्वाच्या सूचना.!!!
वाहनधारकांसाठी मोठी बातमी आहे. ई-चलन न भरलेल्या वाहनधारकांचे वाहन जप्त होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सहायक पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिलीय.
एकीकडे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, असे असताना नागरिकांकडून सर्रास वाहतुकीचे नियम मोडले जातात. वारंवार जनजागृती करूनही नियमांची पायमल्ली केली जाते.
दरम्यान आता ई-चालनद्वारे दंड येत असल्याने आता पोलिसांची पूर्वी असलेली भीतीदेखील लुप्त होत चालली आहे. गतवर्षी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे अशा 1 लाख 98 हजार 589 वाहनचालकांना कैद करून 19 कोटी 42 लाख 86 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. गेल्या दहा वर्षांमध्ये शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली. क्रमाने अरुंद रस्ते, अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे वाहतुकीचा खोळंबा होण्याचे प्रमाणही वाढले.
महापालिका, पोलिस प्रशासन सुरळीत वाहतुकीसाठी सातत्याने अपयशी ठरत असताना, वाहनचालकांचा बेशिस्तपणाही वारंवार उघडकीस येतो. नियम मोडणाऱ्यास ई-चालनद्वारे थेट छायाचित्रांसह दंडाची पावती जाते. दंड ठोठावलेल्या 1 लाख 87 हजार 508 वाहनचालकांकडे अद्यापही 18 कोटी 36 लाख 62 हजार 250 रुपयांचा दंड भरणे बाकी आहे. उलट दिशेने जाणे, सुसाट वाहने पळवणे, हातात मोबाइल धरून वाहन चालवणे, ट्रिपल सीट, फॅन्सी नंबर प्लेट व अनेक प्रकारे वाहतुकीचे सर्रास नियम मोडले जातात.
परंतु वाहतूक दंड प्रलंबित ठेवणाऱ्यांना रितसर नोटीस पाठवली जात आहे, तरीही त्याकडे दुर्लक्ष होत असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. लवकरच दंड वसुलीसाठी मोहीम राबवून कारवाई केली जाईल. दंड न भरणाऱ्या वाहनावर जप्तीची कारवाई सुद्धा होईल, अशी माहिती धनंजय पाटील सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग यांनी दिली.