३८वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड २०२४-२५,पुरूष संघाने केरळवर तर महिला संघाने पश्चिम बंगालवर केली मात.!!!
महाराष्ट्राची गटात अव्वल कामगिरी.•••
३८वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड २०२४-२५,पुरूष संघाने केरळवर तर महिला संघाने पश्चिम बंगालवर केली मात.!!!
महाराष्ट्राची गटात अव्वल कामगिरी.•••
हल्दवानी, क्री. प्र. २९ : हल्दवणी, उत्तराखंड येथे सुरू असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरूष संघाने केरळाचा तर महिला संघाने पश्चिम बंगालचा पराभव करित गटात अव्वल कामगिरी केली.
पुरूषांचा लौकिकास साजेसा खेळ
गतविजेत्या महाराष्ट्राच्या महिला व पुरूष खो-खो संघांनी आपल्या लौकिकास साजेसा खेळ केला. पुरूषांच्या सामन्यात महाराष्ट्र संघाने केरळवर ११ गुणांनी (४७-३६) मात केली. मध्यंतराला महाराष्ट्राकडे १० गुणांची (२४-१४) आघाडी होती. विजयी झालेल्या महाराष्ट्रार्फे कर्णधार गजानन शेंगाळ (१.३० मि., २ मि. संरक्षण आणि २ गुण), राहूल मंडल (१.३० मि. संरक्षण व १० गुण), रामजी कश्यप (१.१० मि., १.४० मि. संरक्षण व ८ गुण), शुभम थोरात (१.४० मि., १.२५ मि. आणि २ गुण) यांनी विजयात मोलाची कामगिरी केली. पराभूत झालेल्या केरळ तर्फे निखिल बी (१.१० मि. संरक्षण व १० गुण), देवनारायण (१ मि. संरक्षण व गुण) यांनी चांगला खेळ केला.
महिलांचा दमदार खेळ
महिला गटातील सामन्यात महाराष्ट्र संघाने पश्चिम बंगालचा एक डाव ४ गुणांनी (२४-२०) सहज पराभव केला. विजयी महाराष्ट्रातर्फे प्रियांका इंगळे (२.१५ मि., नाबाद १.५० मि. आणि ६ गुण), संपदा मोरे (१.३० मि. संरक्षण आणि ६ गुण), पायल पवार (१.४० मिनिटे संरक्षण), संध्या सुरवसे (२.५५ मि. व १.२५ मि. संरक्षण आणि २ गुण) यांनी दमदार खेळ केला. तर पश्चिम बंगालकडून इशिता विश्वास (१.२० मि. संरक्षण व ४ गुण), दिपिका चौधरी (१.१० मि. संरक्षण आणि ४ गुण) यांनी चांगली लढत दिली.