रायगडमध्ये झेंडा फडकवताच आदिती तटकरेंकडून लाडकी बहीण योजनेतील निकषांबाबत स्पष्ट भूमिका

0 477

रायगडमध्ये झेंडा फडकवताच आदिती तटकरेंकडून लाडकी बहीण योजनेतील निकषांबाबत स्पष्ट भूमिका.?

रायगड :-

देशभरात आज ७६वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. महायुती सरकारमधील पालकमंत्र्यांनीही आपल्या जिल्ह्यात जाऊन आज ध्वजारोहन केले. मात्र, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन सध्या महायुतीत वाद असतानाही महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे  यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय ध्वजारोहन केले.

 

प्रजासत्ताक दिन हा दिवस सगळ्यांसाठी सुवर्णक्षण असतो, कोणालाही या दिवशी बहुमान मिळणे हा भाग्याचा दिवस आहे. देशाच्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करणे हे लोकप्रतिनिधींसाठी भाग्याचा दिवस असून तो बहुमान मला मिळाल्याचे सांगत आदिती तटकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहनाचा सन्मान मिळाला त्याबद्दल समाधान व्यक्त केले.

यावेळी, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद व लाडकी बहीण योजनेतील  स्क्रुटीनीबद्दलही त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. राज्यातील लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यातील पैसे मिळण्यास कालपासूनच सुरुवात झाली आहे. त्यासंदर्भाने बोलताना या योजनेतील निकषांत एकही बदल करण्यात आला नसल्याचे आदिती तटकरे यांनी म्हटले.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. पहिल्या दिवशी १ कोटी ७ लाख महिलांना हा लाभ मिळाला तर दुसऱ्या दिवशी १ कोटी २५ लाख महिलांना लाभ मिळाला.

 

दरम्यान, या योजनेतील ३० लाख अर्ज बाद होण्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त काही ठिकाणी छापून आले आहे. मात्र, या अपप्रचारावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे. त्या रायगड येथे बोलत होत्या.

 

३० लाख अर्ज बाद होण्याच्या मार्गावर आहेत, याबाबत आदिती तटकरे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, मला माहीत नाही हा आकडा कुठून येतो. पण माझी सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की अशा कोणत्याही बातम्या आणि अफवांना बळी पडू नका. २ कोटी ४१ लाख महिलांच्या खात्यात लाभ थेट हस्तांतरण करण्यात आलं आहे.’

 

‘पहिल्या दिवशी १ कोटी ७ लाख महिलांना लाभ दिला तर काल सुद्धा १ कोटी २५ लाख महिलांना लाभ वितरित झाला आहे. लाभार्थ्यांचं वितरण नेहमीप्रमाणेच सुरू आहे. ऑक्टोबरमध्ये ९ तारखेला २ कोटी ३४ लाख महिलांना लाभ दिला होता. आता लाभ वितरण २ कोटी ४१ लाख महिलांना झालेला आहे. कोणत्याही अफवांना आणि अपप्रचारांना बळी पडू नये’, असं आदिती तटकरे म्हणाल्या.

 

जुलै २०२४ च्या पावसाळी अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यान्वित केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार, अटी शर्थींच्या आधारे सरकारने महिलांकडून अर्ज भरून घेतले अन् पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत सहा हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत, तर जानेवारीचा सातवा हप्ताही पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!