IMG 20260609 WA1429

कासोदा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; चोरीची मोटारसायकल काही तासांत हस्तगत, एक आरोपी जेरबंद.!!!

53 / 100 SEO Score

कासोदा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; चोरीची मोटारसायकल काही तासांत हस्तगत, एक आरोपी जेरबंद.!!!

 

कासोदा प्रतिनिधी : –

चोरीस गेलेली मोटारसायकल अवघ्या काही तासांत शोधून काढत कासोदा पोलिसांनी तत्परतेचे दर्शन घडविले आहे. या कारवाईत एक आरोपी ताब्यात घेण्यात आला असून चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. तसेच या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दुसऱ्या संशयिताचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वनकोठे (ता. एरंडोल) येथील जीवन पंढरीनाथ पवार (वय 49) यांच्या मालकीची होंडा सीबी शाईन (एमएच-19-डीजी-0072) ही मोटारसायकल 6 जूनच्या मध्यरात्री ते 7 जूनच्या सकाळी दरम्यान घरासमोरील अंगणातून अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. वाहन चोरीस गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर पवार यांनी कासोदा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने फिरविली.

गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार नरेंद्र पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला होता. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. 7 जून रोजी सायंकाळी विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी करण्यात आली.

दरम्यान, नाकाबंदी दरम्यान एक युवक संशयास्पदरीत्या मोटारसायकल चालविताना पोलिसांच्या निदर्शनास आला. त्याला थांबवून वाहनाबाबत विचारपूस करण्यात आली. मात्र त्याने समाधानकारक माहिती न दिल्याने वाहन क्रमांक व इतर कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी सदर मोटारसायकल वनकोठे येथून चोरीस गेलेली असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी तत्काळ रोशनसिंग गोवर्धनसिंग चौहान (वय 22, रा. असरावता, ता. पानसेमल, जि. बडवानी, मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीची मोटारसायकल जप्त करून आवश्यक पंचनामा करण्यात आला. चौकशीदरम्यान आरोपीने या चोरीत आणखी एका साथीदाराचा सहभाग असल्याची माहिती दिली. त्यानुसार कर्तारसिंग जुन्नी (रा. धरणगाव) याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.

या यशस्वी कारवाईमुळे चोरीस गेलेले वाहन अल्पावधीतच मालकास परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पोलिसांच्या तत्पर तपासामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक  पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार नरेंद्र पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top