जळगावमहाराष्ट्र

बालविवाह,पॉक्सो प्रकरणात आरोपींना जामीन

बालविवाह,पॉक्सो प्रकरणात आरोपींना जामीन

पारोळा प्रतिनिधी :-

पारोळा – बालविवाह, सहजीवन प्रकरणात दाखल पॉक्सो कायद्यातील गुन्ह्यात असलेले तीन आरोपींना अमळनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.यात नवऱ्यासह सासरा व दिराची सुटका झाली आहे.

पीडिता ही तेरा वर्षीय असताना तिचा विवाह एका तरुणाशी करण्यात आला होता.विवाहानंतर कालांतराने ती गर्भवती होऊन बाळाला जन्म दिला,याची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली.

याप्रकरणी पीडितेच्या जबाबावरून नवऱ्यासह सासरा व दिर यांच्याविरूद्ध पॉक्सो,बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात आरोपी पक्षातर्फे अ‍ॅड.सिद्धांत उज्वल मिसर यांनी युक्तीवाद केला.हा निकाल न्याय,समाज आणि वास्तव यामधला समतोल साधणारा असुन, न्यायालयाने लक्षपूर्वक निर्णय दिल्याचे सांगितले.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!