तरडी जि.प.शाळेत ८७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट वाटप.!!!
(शिक्षक दांपत्याचा अनोखा उपक्रम)
पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा – सामाजिक बांधिलकीतून शिक्षक दांपत्याने आपल्या मुलाचा वाढदिवस,गरजू आर्थिकदृष्ट्या दुर्बल
विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक साहित्याचे कीट वाटून साजरा केला.ह्या प्रेरणादायी उपक्रमाने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
पारोळा येथील डॉ.व्ही.एम.
जैन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय बडगुजर आणि तरडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपशिक्षिका देवयानी बडगुजर या शिक्षक दांपत्याने चिरंजीव प्रथमेश बडगुजर याचा वाढदिवस निमित्त तरडी येथील जिल्हा परिषद शाळेतील गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा ८७ विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक साहित्याचे कीट वाटप केले.
या उपक्रमात
गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील,शापोआ अधीक्षक चंद्रकांत चौधरी,केंद्रप्रमुख निलेश पाटील,तरडी गावाचे सरपंच,उपसरपंच,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, मुख्याध्यापिका,शिक्षक वृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान या सामाजिक जाणिवेतून साकारलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी सक्षम घटकांनी पुढे येणे गरजेचे आहे,अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता निर्माण होते, असे मत उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.