Tuesday, January 20, 2026
Google search engine
Home Blog Page 9

भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २१ डिसेंबर रोजी मतमोजणी, प्रशासन सज्ज.!!!

0

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण नगरपरिषद क्षेत्रातील सर्व १२ प्रभागांमध्ये मतदान प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. या निवडणुकीसाठी एकूण ४३ मतदान केंद्रांवर सकाळपासून सायंकाळपर्यंत मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार या निवडणुकीची मतमोजणी दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून करण्यात येणार आहे. मतमोजणीचे काम भडगाव तालुका क्रीडा संकुल, पाचोरा रोड, भडगाव येथे होणार असून, याठिकाणी मतमोजणीसाठी आवश्यक सर्व तयारी प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे.

मतमोजणी प्रक्रियेसाठी एकूण ६० अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले असून, मतदान यंत्रावरील मतमोजणीसाठी ६ टेबल आणि पोस्टल मतदानासाठी स्वतंत्र १ टेबल अशा एकूण ७ टेबलांवर मतमोजणी केली जाणार आहे. मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया साधारण ७ ते ८ फेऱ्यांमध्ये पार पडणार असून, प्रत्येक फेरीत अंदाजे २ ते ३ प्रभागांचे निकाल जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मतमोजणीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासन व पोलीस विभागाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तालुका क्रीडा संकुल परिसरात पोलीस बंदोबस्त, प्रवेश नियंत्रण, वाहतूक नियमन तसेच सीसीटीव्ही देखरेख यांसारख्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. केवळ अधिकृत प्रतिनिधी, उमेदवार व निवडणूक आयोगाने दिलेल्या पासधारकांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे.

भडगाव नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण तालुका व जिल्ह्याचे लक्ष लागले असून, मतमोजणीनंतर नगरपरिषदेतील सत्तासमीकरण स्पष्ट होणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता असून, २१ डिसेंबर रोजी भडगाव नगरपरिषदेला नवे नेतृत्व मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

महानगरपालिका निवडणुका २०२६ : ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ‘नोटा’चा इशारा.!!!

1

महानगरपालिका निवडणुका २०२६ : ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ‘नोटा’चा इशारा.!!!

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्रातील मुंबईसह सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका लवकरच होत असून, या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांकडे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ठाम भूमिका मांडली. लाखो ज्येष्ठ नागरिकांचे “सिल्व्हर व्हॉइसेस” ऐकले गेले पाहिजेत, त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे आणि निर्णयप्रक्रियेत त्यांचा अर्थपूर्ण सहभाग सुनिश्चित केला गेला पाहिजे, अशी स्पष्ट मागणी यावेळी करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक हे केवळ लाभार्थी नसून सुमारे २५ टक्के मतदानसंख्या असलेला एक महत्त्वाचा मतदारवर्ग असल्याने, त्यांच्या मागण्या दुर्लक्षित राहिल्यास आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये ‘नोटा’ या लोकशाही पर्यायाचा वापर करण्याचा इशाराही संयुक्त कृती समितीने दिला. “ज्येष्ठांना दया नव्हे, तर सन्मान हवा,” असे ठाम मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

२०१२ पासून कार्यरत असलेल्या संयुक्त कृती समितीच्या मंचामध्ये २८ ज्येष्ठ नागरिक संघटना, स्वयंसेवी संस्था, संशोधक आणि शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांची सनद (चार्टर ऑफ डिमांड्स) सादर करण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रात सध्या सुमारे १.५ कोटी ज्येष्ठ नागरिक असून ते राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ११.७ टक्के आहेत. मुंबईत ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या सुमारे १५ लाख असून, २०३१ पर्यंत ती जवळपास २४ लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने २०१३ साली जाहीर केलेल्या ज्येष्ठ नागरिक धोरणाचा उद्देश ‘वय-मैत्रीपूर्ण मुंबई’ निर्माण करणे हा होता. या धोरणांतर्गत डे-केअर सेंटर्स, नाना–नानी उद्याने, ज्येष्ठांसाठी विशेष रुग्णालय सुविधा, वैद्यकीय हेल्पलाईन तसेच रॅम्प्स व हॅण्डरेल्ससह सुलभ सार्वजनिक पायाभूत सुविधांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, पुरेशा निधीअभावी आणि स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणेच्या अभावामुळे या धोरणाची अंमलबजावणी अपुरी आणि संथ राहिल्याची तीव्र खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.

पत्रकार परिषदेत बोलताना मुंबईच्या माजी महापौर ॲड. निर्मला सामंत प्रभावळकर यांनी स्पष्ट केले की, ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित होणारे मनोरंजनात्मक व विरंगुळ्याचे उपक्रम उपयुक्त असले तरी त्यांच्या आरोग्यसेवा, रुग्णालयांतील स्वतंत्र सुविधा, डे-केअर सेंटर्स, नाना–नानी उद्याने, थेरपी आणि काळजी सेवा या मूलभूत गरजांकडे प्रशासनाचे पुरेसे लक्ष नाही. मुंबईसारख्या महानगरात १५ लाख ज्येष्ठ नागरिक असताना या सुविधा अत्यंत अपुऱ्या असून, त्या तातडीने आणि मोठ्या प्रमाणावर वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

संयुक्त कृती समितीच्या सनदीनुसार महानगरपालिका अर्थसंकल्पातील किमान १० टक्के निधी ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी राखीव ठेवावा, प्रत्येक प्रभागात स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक अधिकारी नेमावा, तसेच ‘वय-मैत्रीपूर्ण मुंबई’साठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा आणि स्वतंत्र अर्थसंकल्प तातडीने स्थापन करावा, अशी ठोस मागणी करण्यात आली. आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी ज्येष्ठ नागरिकांची सनद त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात औपचारिकरीत्या समाविष्ट करून कालबद्ध व मोजता येण्याजोग्या कृतींची हमी द्यावी, असेही आवाहन करण्यात आले. मागील निवडणुकांमध्ये ‘नोटा’च्या वाढलेल्या प्रमाणाचा उल्लेख करत, आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कृतीला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन सोफिया महाविद्यालयाच्या प्रा. अनघा तेंडुलकर यांनी केले, तर शैलेश मिश्रा यांनी आभार प्रदर्शन केले. विचारमंचावर ॲड. निर्मला सामंत प्रभावळकर, प्रकाश बोरगांवकर, विजय औंधे, डॉ. रेखा भटखंडे आणि शैलेश मिश्रा उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांना सन्मान, सुरक्षितता, सहभाग आणि स्वावलंबन मिळाले पाहिजे, हा ठाम संदेश या पत्रकार परिषदेतून देण्यात आला.

अलसूफ्फा फाउंडेशनतर्फे जारगावच्या नवनिर्वाचित सरपंच दानिश बागवान यांचा पाचोरा येथे सत्कार

0

 

पाचोरा प्रतिनिधी :-

पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंचपदी निवड झाल्याबद्दल दानिश मुख्तार बागवान यांचा अलसूफ्फा फाउंडेशनच्या वतीने पाचोरा येथे सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. सामाजिक सलोखा, विकासात्मक दृष्टीकोन आणि लोकाभिमुख कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या दानिश बागवान यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी अलसूफ्फा फाउंडेशनचे अध्यक्ष मुस्लिम भाई बागवान होते. कार्यक्रमास जारगाव ग्रामपंचायतीचे सदस्य इस्राईल बागवान, राजू शेख, रज्जू बागवान, अकबर बिल्डर, हमीद शाह तसेच नवनिर्वाचित सरपंच दानिश बागवान यांचे वडील मुख्तार गनी बागवान यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी नगरसेवक रहीम बागवान यांनी नवनिर्वाचित सरपंचाने सर्व समाजघटकांना सोबत घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर मोहसीन खान सर यांनी ग्रामविकासात युवकांची भूमिका महत्त्वाची असून दानिश बागवान यांच्या नेतृत्वाखाली जारगाव ग्रामपंचायत निश्चितच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमास तसलीम बागवान, हाजी सलीम बागवान, वसीम यासीन बागवान, नईम हाजी सलीम बागवान, माजी नगरसेवक अय्युब बागवान, बागवान जमात अध्यक्ष शकुर बागवान, ॲड. वसीम बागवान, इमाद बागवान, शकील बरफवाला, अज्जू भाई खान, शाकीर बागवान, रफीक शब्बीर बागवान, अक्रम कुरेशी, अमीन बागवान, अनस बागवान यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फहीम सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार माजी नगरसेवक रहीम बागवान यांनी मानले. सदर कार्यक्रम सौहार्दपूर्ण वातावरणात उत्साहात पार पडला.

आंबेडकर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या सल्लागारपदी श्री. मिलिंद चौधरी यांची नियुक्ती

0

आंबेडकर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या सल्लागारपदी श्री. मिलिंद चौधरी यांची नियुक्ती

 

आंबेडकर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (ACCI) यांच्या सल्लागारपदी श्री. मिलिंद चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चेंबरच्या संघटनात्मक वाढीसाठी, प्रभावी प्रशासनासाठी तसेच दीर्घकालीन मूल्यनिर्मितीसाठी धोरणात्मक दिशानिर्देश व तज्ज्ञ सल्ला देण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

 

आंबेडकर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ही एक राष्ट्रीय स्तरावरील व्यावसायिक संघटना असून, समावेश, सक्षमीकरण आणि आर्थिक न्याय यांच्या माध्यमातून भारताच्या उद्योजकीय परिसंस्थेत सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी ती कार्यरत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टी, बुद्धिमत्ता आणि सुधारणावादी विचारसरणीने प्रेरित होऊन, चेंबर समान आणि सर्वसमावेशक व्यवसाय परिसंस्था उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे. जात, समुदाय किंवा सामाजिक पार्श्वभूमी कोणतीही असो, प्रत्येक व्यक्तीला व्यवसायात सहभागी होण्याची, प्रगती करण्याची आणि नेतृत्व करण्याची संधी मिळावी, हा चेंबरचा मुख्य उद्देश आहे.

 

भारतातील आर्थिक संधींचे लोकशाहीकरण करण्यासाठी आंबेडकर चेंबर महत्त्वाची भूमिका बजावत असून, उद्योगजगत, शासकीय यंत्रणा, वित्तीय संस्था आणि उपेक्षित उद्योजक यांच्यातील दुवा म्हणून ते कार्य करते. उद्योजकतेला प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्याचे प्रभावी साधन मानत, आर्थिक सक्षमीकरणाशिवाय सामाजिक समानता अपूर्ण आहे, या विचाराला चेंबर बळकटी देते.

श्री. मिलिंद चौधरी हे गेल्या दहा वर्षांपासून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या व्यापक अनुभवाचा लाभ आता आंबेडकर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीला सल्लागार म्हणून मिळणार आहे.

मतमोजणी दिवशी गोंधळ झाल्यास तात्काळ कठोर कारवाई राज्य निवडणूक आयोगाकडून अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना

0

मतमोजणी दिवशी गोंधळ झाल्यास तात्काळ कठोर कारवाई

राज्य निवडणूक आयोगाकडून अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना

मुंबई :

नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदान व मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी दक्ष राहावे, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. काही ठिकाणी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार असून, सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे.

मतदान व मतमोजणीच्या तयारीसंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची 16 व 17 डिसेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली. यावेळी आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वाघमारे यांनी स्पष्ट केले की, मतदान व मतमोजणीची प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडणे अत्यावश्यक आहे. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्वरित कठोर कारवाई करावी. केलेल्या कारवाईची माहिती प्रसारमाध्यमांना तसेच राज्य निवडणूक आयोगाला तात्काळ कळवावी, अन्यथा चुकीचे चित्र निर्माण होण्याची शक्यता असते.

सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मतमोजणीचे निकाल आणि त्यानंतरची परिस्थिती लक्षात घेता पोलीस प्रशासन व इतर यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवणे आवश्यक आहे. तसेच मतदानाच्या आदल्या दिवशी, म्हणजे 19 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजेनंतर कोणत्याही प्रकारची प्रचार जाहिरात इलेक्ट्रॉनिक किंवा मुद्रित माध्यमांतून प्रसिद्ध करता येणार नाही, याबाबत सर्व संबंधितांना सूचित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी सांगितले की, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मतदान व मतमोजणीच्या दिवशी योग्य बंदोबस्त ठेवण्यात यावा. एखादी घटना घडल्यानंतर कारवाई होत असली तरी ती जनतेसमोर येत नाही, त्यामुळे गैरसमज निर्माण होतात. हे टाळण्यासाठी कारवाईची माहिती वेळेवर प्रसिद्ध करणे गरजेचे आहे.

भडगाव येथील आदर्श इंग्लिश मेडियम स्कूल मधील दोन बालकांच्या मृत्यू प्रकरणी;६ संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी

0

भडगाव येथील आदर्श इंग्लिश मेडियम स्कूल मधील दोन बालकांच्या मृत्यू प्रकरणी;६ संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी

संचालक मंडळासह महिला प्राचार्य वर गुन्हा दाखल

भडगाव प्रतिनिधी  :-

भडगाव येथील आदर्श कन्या शाळेच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण तालुका हादरला. नर्सरीमध्ये शिक्षण घेत असलेली दोन बालके शाळेच्या बाजूला असलेल्या शौचालयाच्या लगत वाहणाऱ्या कोल्हा नाल्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता उघडकीस आली.

या घटनेत अंश सागर तहसीलदार (वय ३ वर्षे ६ महिने, रा. बालाजी गल्ली, भडगाव) आणि मयंक उर्फ संकेत ज्ञानेश्वर वाघ (वय ४ वर्षे २ महिने, रा. आदर्श कॉलनी, भडगाव) या दोन बालकांचा समावेश आहे . घटनेची माहिती मिळताच पालक,नातेवाईक व नागरिकांनी शाळा परिसरात धाव घेतली. नातलग व नागरिकांनी तब्बल तीन तासांहून अधिक वेळ शाळा परिसरात ठिय्या मांडला. या वेळी आदर्श कन्या विद्यालयातील एका खोलीत शिक्षकांना एकत्रित बसवून ठेवण्यात आले होते. शिक्षकांना बाहेर सोडा, संस्था चालकांना आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्यांना जाब विचारू; आमची मुले परत द्या, अन्यथा मृतदेह शाळेत आणू—असा आक्रमक पवित्रा नातलगांनी घेतला होता.

परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पाचोरा पोलिस निरीक्षक राहुलपवार पुढाकर घेतला आणि जमावाला शांत केले.

यांच्यासह पोलिसांनी शाळा परिसरात चोख बंदोबस्त ठेवत नातलगांची समजूत काढली. दरम्यान, या प्रकरणाचा तपास भडगाव पोलिसांकडे न देता अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात यावा, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.

 या प्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात मंगळवार दि.१६ संध्याकाळी सहा वाजे दरम्यान मयत मुलाचे वडील यांचे फिर्यादी वरून संस्थेचे संचालक दीपक संभाजी महाजन , रमेश एकनाथ महाजन ,रविंद्र एकनाथ महाजन , मनोज कौतिक महाजन , विनोद शिवराम महाजन सर्व राहणार भडगाव , प्राचार्य सोनिया भादू वंजारी, रा. पळसखेडा ता भडगाव यांचे वर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना भडगाव न्यायालयात हजर केले असता सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावून आरोपींची नंदुरबार कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

 

चौकट…

या घटने प्रकरणी घटनास्थळी काल जळगांव जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकरी मिनल करनवाल यांनी भेट देऊन पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन करीत योग्य त्या सुचना देत झालेल्या घटनेबाबत पोलिसांचा चौकशी आहवाल आल्या नतंर प्राप्त अहवालानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले

प्रा. प्राजक्ता देशमुख यांना रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी घोषित.!!!

0

प्रा. प्राजक्ता देशमुख यांना रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी घोषित.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित भडगाव येथील सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागात कार्यरत असलेल्या प्रा. प्राजक्ता विजयकुमार देशमुख यांना नुकतीच श्री. जगदीशप्रसाद झाबरमल टिबरेवाला विद्यापीठ (JJTU), झुनझुनू (राजस्थान) यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. (आचार्य) पदवी घोषित केली. त्यांच्या शोधप्रबंधाचा विषय ‘Synthesis and Characterization of Biofertilizer Prepared from Organic Waste Materials and Animal Waste with it’s Application on Crops’ हा असून त्यांना नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथील उपप्राचार्य व रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. माधुरी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले आजोबा कै. नानासाहेब देशमुख, आई-वडील, पती प्रा. डॉ. अतुल देशमुख तसेच कुटुंबीय यांना दिले आहे.

 

प्रा. प्राजक्ता देशमुख यांना पीएच.डी. पदवी घोषित झाल्याबद्दल पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप ओंकार वाघ, चेअरमन संजय ओंकार वाघ, मानद सचिव ॲड. महेश सदाशिवराव देशमुख, व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी, प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड, उपप्राचार्य डॉ. दीपक मराठे, पाचोरा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. शिरिष पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य प्रा.डॉ. जे. व्ही. पाटील, भडगावचे रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. जी. शेलार, सर्व प्राध्यापक वृंद, प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.

वाक येथे श्री.दत्तु प्रभुंचा दि.१३ रोजी याञोत्सव.!!!

0

भडगाव प्रतिनिधी :-

तालुक्यातील वाक येथे श्री.दत्तप्रभुंचा याञोत्सव दरवर्षाप्रमाणे यावर्षीही दि. १३ रोजी शनिवारी भरणार आहे. याञोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी मंगल स्नान, सायंकाळी ५ वाजता आरती, सायंकाळी पालखीचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात्रेनिमित्त दरवर्षी १० ते १२ लोकनाटय तमाशाचे कार्यक्रमही राञी होत असतात.याही वेळी राञी ७ ते ८ लोकनाटय तमाशांचे कार्यक्रम होणार आहेत. तसेच तमाशांच्या हजेरींचा कार्यक्रम दुपारी ४ वाजता होणार आहे. याञोत्सवात मोठ्या प्रमाणात लहान, मोठे पाळणे, संसार उपयोगी, कटलरी दुकाने, मिठाईचे दुकाने मोठ्या प्रमाणात भरत असतात. यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे दुपारी २ वाजेपासुन रात्रभर ही यात्रा अविरतपणे चालु असते. या याञोत्सवासाठी परीसरातील अनेक गावांचे भाविक, नागरीक या याञोत्सवात सहभागी होत असतात. तरी दर्शनासह याञोत्सवाचा लाभ भाविकांनी घ्यावा. असे आवाहन वाक येथील ग्रामस्थ मंडळी आयोजकांमार्फत करण्यात आलेले आहे.

मानवाधिकार दिनानिमित्त भडगाव येथे भ्रष्टाचार निवारण संघटनेचा नियुक्तीपत्र व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.!!!

0

मानवाधिकार दिनानिमित्त भडगाव येथे भ्रष्टाचार निवारण संघटनेचा नियुक्तीपत्र व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.!!!

भडगाव प्रतिनिधी :–

दिनांक 10 डिसेंबर 2025, जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेतर्फे भडगाव पोलीस स्टेशन येथे एक भव्य व उत्साहपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मनीष भिला सोनवणे यांना भ्रष्टाचार निवारण विभागाचा अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले.

नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा मान भडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. महेशजी शर्मा साहेब यांना मिळाला. नियुक्तीपत्र स्वीकारल्यानंतर सोनवणे यांनी संघटनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी निष्ठेने कार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा विशेष सत्कार करून शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या.

कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. महेशजी मीना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचारमुक्त व न्यायप्रणाली बळकट करण्यासाठी संघटना सातत्याने कार्यरत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमात संघटनेचे अन्य पदाधिकारी यांचाही सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी मान्यवर म्हणून उपस्थित होते —

महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष: शेख शकील शेख बाबू

पदाधिकारी: संजय अभिमान पाटील, जयदीप पाटील

भडगाव पोलीस स्टेशनचे एस.आय.: भूषण पाटील

गुप्तचर विभाग: निलेश बामनकर

मानवाधिकार कार्यकर्ते: भालचंद्र देशमुख

तसेच तालुक्यातील इतर सर्व पदाधिकारी व मान्यवर नागरिक.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी भ्रष्टाचार निर्मूलन, नागरिकांचे हक्क, तसेच समाजातील पारदर्शकता टिकविण्यासाठी नागरिकांनी सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन केले. मानवाधिकार दिनाचे महत्व अधोरेखित करत सामाजिक बांधिलकी वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला.

कार्यक्रम शिस्तबद्ध, उत्साही आणि सामाजीक बांधिलकीची भावना वाढविणारा ठरला. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

वाडे येथे धन निरंकार मंडळामार्फत रक्तदान शिबीर. ४० रक्तदात्यांनी केले रक्तदान.!!!

0

भडगाव प्रतिनिधी :—

रक्तदान हेच जीवनदान,रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडु लागला आहे.याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने धुळे झोन ३६ बी अंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन दिल्ली ब्रॅंच बहाळच्या अंतर्गत वाडे या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे रक्तदान शिबीर वाडे येथील जिल्हा परीषद मराठी मुलांच्या शाळेत नुकतेच पार पडले. या शिबीरात जवळपास ४० रक्तदात्यांनी रक्तदान करुन सहभाग नोंदवुन तसे प्रमाणपञ रक्तदान करणार्या व्यक्तींना मिळालेले आहेत.

या कार्यक्रमात परम श्रध्देय पुजनीय महात्मा हिरालाल पाटील (झोनल ईचांर्ज झोन ३६ बी,धुळे) व महात्मा महेश वाघ (संयोजक पाचोरा सेक्टर २ ), चाळीसगाव ब्रॅंचमुखी झुलेलाल पंजाबी तसेच पाचोरा-भडगांव मतदार संघातील आमदार किशोर पाटील , बाजार समितीचे माजी सभापती रावसाहेब पाटील यांनी रक्तदान शिबिरास भेट दिली.

 

रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे.अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यु होण्याच्या घटना कानावर येतात.त्यामुळे तरुणाईने अधिकाअधिक रक्तदान करण्याचे आवाहन बहाळ ब्रॅंच आयोजकांमार्फत करण्यात आले होते. रक्तदान शिबीरात जवळपास ४० सदस्यांनी रक्तदान केले .सामान्य जनतेस हा मदतीचा हात मिळावा या अनुषंगाने या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

 

या कार्यक्रमास श्री. निरंकारी मिशनचे बहाळ ब्रॅंच मुखी विजयसिंग परदेशी वाडे , श्री. हनुमान विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन उदयसिंग परदेशी, पोलीस पाटील अरविंद पाटील, फौजी एकनाथ माळी, पञकार अशोक परदेशी ,

भाऊलाल परदेशी टेकवाडे, फौजी समाधान पाटील, धोंडुसिंग परदेशी ,अनिल बागुल,बापु सोनार, लक्ष्मण पाटील,प्रमोद बैरागी, शाहीर मन्साराम जाधव, घुसर्डीचे संग्रामसिंग परदेशी, मी वाडेकर ग्रृपचे वार्ताहर जगतसिंग राजपुत यांचेसह नागरीक, सेवेकरी मोठया संख्येने उपस्थित होते. शिबीर कार्यक्रम यशस्विततेसाठी वाडे, बहाळ ब्रॅंच निरंकारी मिशनचे सेवेकरी मंडळींनी विशेष परीश्रम घेतले. तर शिबीराकामी धुळे येथील सिव्हील हाॅस्पीटलचे वैदयकीय स्टाॅफ यांचेही अनमोल सहकार्य लाभले.

error: Content is protected !!