प्रा. प्राजक्ता देशमुख यांना रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी घोषित.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित भडगाव येथील सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागात कार्यरत असलेल्या प्रा. प्राजक्ता विजयकुमार देशमुख यांना नुकतीच श्री. जगदीशप्रसाद झाबरमल टिबरेवाला विद्यापीठ (JJTU), झुनझुनू (राजस्थान) यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. (आचार्य) पदवी घोषित केली. त्यांच्या शोधप्रबंधाचा विषय ‘Synthesis and Characterization of Biofertilizer Prepared from Organic Waste Materials and Animal Waste with it’s Application on Crops’ हा असून त्यांना नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथील उपप्राचार्य व रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. माधुरी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले आजोबा कै. नानासाहेब देशमुख, आई-वडील, पती प्रा. डॉ. अतुल देशमुख तसेच कुटुंबीय यांना दिले आहे.
प्रा. प्राजक्ता देशमुख यांना पीएच.डी. पदवी घोषित झाल्याबद्दल पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप ओंकार वाघ, चेअरमन संजय ओंकार वाघ, मानद सचिव ॲड. महेश सदाशिवराव देशमुख, व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी, प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड, उपप्राचार्य डॉ. दीपक मराठे, पाचोरा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. शिरिष पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य प्रा.डॉ. जे. व्ही. पाटील, भडगावचे रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. जी. शेलार, सर्व प्राध्यापक वृंद, प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.
