भडगाव येथील आदर्श इंग्लिश मेडियम स्कूल मधील दोन बालकांच्या मृत्यू प्रकरणी;६ संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी
संचालक मंडळासह महिला प्राचार्य वर गुन्हा दाखल
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव येथील आदर्श कन्या शाळेच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण तालुका हादरला. नर्सरीमध्ये शिक्षण घेत असलेली दोन बालके शाळेच्या बाजूला असलेल्या शौचालयाच्या लगत वाहणाऱ्या कोल्हा नाल्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता उघडकीस आली.
या घटनेत अंश सागर तहसीलदार (वय ३ वर्षे ६ महिने, रा. बालाजी गल्ली, भडगाव) आणि मयंक उर्फ संकेत ज्ञानेश्वर वाघ (वय ४ वर्षे २ महिने, रा. आदर्श कॉलनी, भडगाव) या दोन बालकांचा समावेश आहे . घटनेची माहिती मिळताच पालक,नातेवाईक व नागरिकांनी शाळा परिसरात धाव घेतली. नातलग व नागरिकांनी तब्बल तीन तासांहून अधिक वेळ शाळा परिसरात ठिय्या मांडला. या वेळी आदर्श कन्या विद्यालयातील एका खोलीत शिक्षकांना एकत्रित बसवून ठेवण्यात आले होते. शिक्षकांना बाहेर सोडा, संस्था चालकांना आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्यांना जाब विचारू; आमची मुले परत द्या, अन्यथा मृतदेह शाळेत आणू—असा आक्रमक पवित्रा नातलगांनी घेतला होता.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पाचोरा पोलिस निरीक्षक राहुलपवार पुढाकर घेतला आणि जमावाला शांत केले.
यांच्यासह पोलिसांनी शाळा परिसरात चोख बंदोबस्त ठेवत नातलगांची समजूत काढली. दरम्यान, या प्रकरणाचा तपास भडगाव पोलिसांकडे न देता अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात यावा, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
या प्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात मंगळवार दि.१६ संध्याकाळी सहा वाजे दरम्यान मयत मुलाचे वडील यांचे फिर्यादी वरून संस्थेचे संचालक दीपक संभाजी महाजन , रमेश एकनाथ महाजन ,रविंद्र एकनाथ महाजन , मनोज कौतिक महाजन , विनोद शिवराम महाजन सर्व राहणार भडगाव , प्राचार्य सोनिया भादू वंजारी, रा. पळसखेडा ता भडगाव यांचे वर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना भडगाव न्यायालयात हजर केले असता सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावून आरोपींची नंदुरबार कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
चौकट…
या घटने प्रकरणी घटनास्थळी काल जळगांव जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकरी मिनल करनवाल यांनी भेट देऊन पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन करीत योग्य त्या सुचना देत झालेल्या घटनेबाबत पोलिसांचा चौकशी आहवाल आल्या नतंर प्राप्त अहवालानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले
