पाचोरा प्रतिनिधी :-
पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंचपदी निवड झाल्याबद्दल दानिश मुख्तार बागवान यांचा अलसूफ्फा फाउंडेशनच्या वतीने पाचोरा येथे सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. सामाजिक सलोखा, विकासात्मक दृष्टीकोन आणि लोकाभिमुख कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या दानिश बागवान यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी अलसूफ्फा फाउंडेशनचे अध्यक्ष मुस्लिम भाई बागवान होते. कार्यक्रमास जारगाव ग्रामपंचायतीचे सदस्य इस्राईल बागवान, राजू शेख, रज्जू बागवान, अकबर बिल्डर, हमीद शाह तसेच नवनिर्वाचित सरपंच दानिश बागवान यांचे वडील मुख्तार गनी बागवान यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी नगरसेवक रहीम बागवान यांनी नवनिर्वाचित सरपंचाने सर्व समाजघटकांना सोबत घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर मोहसीन खान सर यांनी ग्रामविकासात युवकांची भूमिका महत्त्वाची असून दानिश बागवान यांच्या नेतृत्वाखाली जारगाव ग्रामपंचायत निश्चितच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमास तसलीम बागवान, हाजी सलीम बागवान, वसीम यासीन बागवान, नईम हाजी सलीम बागवान, माजी नगरसेवक अय्युब बागवान, बागवान जमात अध्यक्ष शकुर बागवान, ॲड. वसीम बागवान, इमाद बागवान, शकील बरफवाला, अज्जू भाई खान, शाकीर बागवान, रफीक शब्बीर बागवान, अक्रम कुरेशी, अमीन बागवान, अनस बागवान यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फहीम सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार माजी नगरसेवक रहीम बागवान यांनी मानले. सदर कार्यक्रम सौहार्दपूर्ण वातावरणात उत्साहात पार पडला.
