भडगाव प्रतिनिधी :—
रक्तदान हेच जीवनदान,रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडु लागला आहे.याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने धुळे झोन ३६ बी अंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन दिल्ली ब्रॅंच बहाळच्या अंतर्गत वाडे या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे रक्तदान शिबीर वाडे येथील जिल्हा परीषद मराठी मुलांच्या शाळेत नुकतेच पार पडले. या शिबीरात जवळपास ४० रक्तदात्यांनी रक्तदान करुन सहभाग नोंदवुन तसे प्रमाणपञ रक्तदान करणार्या व्यक्तींना मिळालेले आहेत.
या कार्यक्रमात परम श्रध्देय पुजनीय महात्मा हिरालाल पाटील (झोनल ईचांर्ज झोन ३६ बी,धुळे) व महात्मा महेश वाघ (संयोजक पाचोरा सेक्टर २ ), चाळीसगाव ब्रॅंचमुखी झुलेलाल पंजाबी तसेच पाचोरा-भडगांव मतदार संघातील आमदार किशोर पाटील , बाजार समितीचे माजी सभापती रावसाहेब पाटील यांनी रक्तदान शिबिरास भेट दिली.
रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे.अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यु होण्याच्या घटना कानावर येतात.त्यामुळे तरुणाईने अधिकाअधिक रक्तदान करण्याचे आवाहन बहाळ ब्रॅंच आयोजकांमार्फत करण्यात आले होते. रक्तदान शिबीरात जवळपास ४० सदस्यांनी रक्तदान केले .सामान्य जनतेस हा मदतीचा हात मिळावा या अनुषंगाने या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास श्री. निरंकारी मिशनचे बहाळ ब्रॅंच मुखी विजयसिंग परदेशी वाडे , श्री. हनुमान विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन उदयसिंग परदेशी, पोलीस पाटील अरविंद पाटील, फौजी एकनाथ माळी, पञकार अशोक परदेशी ,
भाऊलाल परदेशी टेकवाडे, फौजी समाधान पाटील, धोंडुसिंग परदेशी ,अनिल बागुल,बापु सोनार, लक्ष्मण पाटील,प्रमोद बैरागी, शाहीर मन्साराम जाधव, घुसर्डीचे संग्रामसिंग परदेशी, मी वाडेकर ग्रृपचे वार्ताहर जगतसिंग राजपुत यांचेसह नागरीक, सेवेकरी मोठया संख्येने उपस्थित होते. शिबीर कार्यक्रम यशस्विततेसाठी वाडे, बहाळ ब्रॅंच निरंकारी मिशनचे सेवेकरी मंडळींनी विशेष परीश्रम घेतले. तर शिबीराकामी धुळे येथील सिव्हील हाॅस्पीटलचे वैदयकीय स्टाॅफ यांचेही अनमोल सहकार्य लाभले.
