अखेर भडगाव ते वाडे बंद बसफेर्या सुरु. अशोकबापु परदेशी यांचे प्रयत्नाला आले यश. चालक व वाहकांचा केला सत्कार.
भडगाव प्रतिनिधी :—
भडगाव ते वाडे काही बस फेर्या पाचोरा आगारामार्फत काही दिवसांपासुन अचानक बंद करण्यात आलेल्या होत्या. या काही बस फेर्या बंद असल्याने प्रवाशांचे प्रवासासाठी अतोनात होल होत होते. या बंद बस फेर्या सुरु करण्यात याव्यात. प्रवाशांचे होणारे हाल थांबवावेत. या मागणीचे निवेदन पञकार अशोकबापु परदेशी यांनी भडगाव बसस्थानक वाहतुक निरीक्षक आर. एस. चौधरी , पाचोरा आगाराला दि. २९ रोजी बुधवारी दिलेले होते. बंद बस फेर्या तात्काळ सुरु न केल्यास आपण भडगाव बसस्थानकासमोर प्रवाशांसह उपोषणास बसु असा ईशारा दिला होता. माञ
एस टी महामंडळाने या निवेदनाची तात्काळ दखल घेतली असुन भडगाव ते वाडे बंद बस फेर्या दि. ६ रोजी गुरुवार पासुन पुर्ववत सुरु करण्यात आल्या आहेत. पञकार अशोकबापु परदेशी यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. सर्व बस फेर्या सुरु झाल्याने प्रवाशांसह विदयार्थ्यांची प्रवासासाठी मोठी सोय झाली आहे.
याबद्दल प्रवाशांसह विदयार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बस फेर्या सुरु होताच भडगाव बस स्थानकात दि. ६ रोजी गुरुवारी पञकार अशोकबापु परदेशी यांचेसह वाडे येथील पी. आर. माळी, पञकार राजु शेख आदिंनी बसचे चालक शरद कोळी व वाहक वाय. डी. सैंदाणे यांचे पुष्पगुच्छ, श्रीफळ, शाल देऊन सत्कार केला. व भडगाव ते वाडे सर्व बस फेर्या पुर्ववत सुरु झाल्याबद्दल एस टी महामंडळाचे भडगाव ते वाडे गावादरम्यान सर्व गावांमार्फत, प्रवाशांमार्फत अशोकबापु परदेशी यांनी आभार मानले आहेत. यावेळी भडगाव बसस्थानकाचे वाहतुक नियंञक पी. एम. राठोड यांचेसह प्रवाशी वर्ग मोठया संख्येने हजर होते.भडगाव ते कोठली, वढधे,निंभोरा,
लोणपिराचे, बोरनार, बोदर्डे, कनाशी, देव्हारी, गोंडगाव, सावदे, घुसर्डी, दलवाडे, नावरे, बांबरुड प्र. ब, वाडे, टेकवाडे बुद्रुक आदि सर्व गावातील प्रवाशी, विदयार्थ्यांची प्रवासासाठी मोठी सोय झाली आहे. अशोकबापु परदेशी यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. याबाबत नागरीक, प्रवाशी वर्गाचेही सहकार्य लाभले. या बस सेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा असे आव्हानही करण्यात आले आहे.











