“एक शाम किशोर अप्पा के नाम” — पाचोर्यात ६ नोव्हेंबरला शायरीचा सोहळा.!!!
देशभरातील प्रख्यात शायरांचा सहभाग; साहित्य-संस्कृतीचा मेळा सजणार
“एक शाम किशोर अप्पा के नाम” — पाचोर्यात ६ नोव्हेंबरला शायरीचा सोहळा.!!!
देशभरातील प्रख्यात शायरांचा सहभाग; साहित्य-संस्कृतीचा मेळा सजणार
पाचोरा प्रतिनिधी :-
आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त “एक शाम किशोर अप्पा के नाम” हा अखिल भारतीय मुशायरा गुरुवार, दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता पाचोरा येथील आठवडे बाजार मैदानावर भव्यदिव्य सोहळ्याने रंगणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी महापौर श्री. संजय गोहिल भूषविणार असून, मुख्य पाहुणे आमदार किशोर आप्पा पाटील (भडगाव-पाचोरा मतदारसंघ) उपस्थित राहणार आहेत.
देशभरातील नामांकित शायर व कवयित्री या मुशायर्यात सहभागी होऊन आपल्या शायरीच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. शायरांच्या फेहरिस्तीत हामिद भुसावली, अल्ताफ ज़िया, तबरेज़ राणा, निकहत अमरोहवी, हिमांशी बाबरा, इमरान रशीद, इब्राहीम सागर, पप्लू लखनऊ, मुजावर मेलेगाव आणि निजमा: जमील साही या दिग्गजांची नावे अग्रक्रमाने समाविष्ट आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन हाजी अबुलेस शेख अलाउद्दीन, मोहसिन खान सर,आणि अकरम कुरेशी,यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आले आहे. स्थानिक साहित्यप्रेमी, युवक संघटना आणि सांस्कृतिक मंडळांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या मुशायर्याचे उद्दिष्ट साहित्य, संस्कृती आणि सामाजिक सौहार्दाचा संदेश पोहोचवणे हे असून, आयोजकांनी सांगितले की “शब्दांच्या माधुर्यातून प्रेम आणि एकतेचा सुगंध दरवळवणे” हेच या कार्यक्रमाचे खरे ध्येय आहे.
पाचोरा शहरात अशा दर्जेदार शायरी संमेलनाचे आयोजन प्रथमच होत असल्याने साहित्यप्रेमी व रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.