शेवगाव न्यायालयातील वकिलावर हल्ला प्रकरणी भडगाव वकील संघाचा तीव्र निषेध.!!!

लाल पट्टी लावून केले कामकाज; ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर करण्याची मागणी

0 78

शेवगाव न्यायालयातील वकिलावर हल्ला प्रकरणी भडगाव वकील संघाचा तीव्र निषेध.!!!

लाल पट्टी लावून केले कामकाज; ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर करण्याची मागणी

भडगाव प्रतिनिधी:-

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव न्यायालयात एका प्रकरणाच्या उलट तपासामुळे फिर्यादीने वकिलावर केलेल्या हल्ल्याच्या घटनेने न्यायव्यवस्थेतील वकिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा भडगाव येथील वकील संघातर्फे आज (दि. ३ नोव्हेंबर) जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

न्यायालयीन परिसरात सर्व वकिलांनी आपल्या काळ्या कोटावर लाल पट्टी लावून शांततेत निषेध नोंदवला. दिवसभर वकिलांनी कामकाज सुरू ठेवत असतानाही हल्ल्याच्या घटनेचा निषेध करत सरकारकडे तातडीने “ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट” मंजूर करण्याची मागणी केली.

भडगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲड. बी. आर. पाटील म्हणाले की, “वकिलांवर वाढत्या हल्ल्यांच्या घटना अत्यंत गंभीर असून, न्यायव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक म्हणून वकिलांना कायद्याने संरक्षण देणे आवश्यक आहे. शेवगावमधील घटनेतील दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि सरकारने त्वरित ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करावा, अशी मागणी आम्ही करतो.”

उपाध्यक्ष ॲड. भैय्यासाहेब अहिरे यांनी सांगितले की, “वकिलांवर हल्ले होणे म्हणजे न्यायप्रक्रियेवरच आघात आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून सरकारने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.”

या निषेध आंदोलनात ॲड. भरत ठाकरे (सचिव), ॲड. आर. के. वाणी, ॲड. एम. बी. पाटील, ॲड. पी. बी. तिवारी, ॲड. के. टी. पाटील, ॲड. के. पवार, ॲड. आप्पासाहेब सोनवणे, ॲड. गणेश वेलसे, ॲड. उमेश महाजन, ॲड. रोहित मिसर, ॲड. रवींद्र ब्राह्मणे, ॲड. समाधान सोनवणे, ॲड. सलमान बेग, इरफान बेग तसेच अन्य वकील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भडगाव न्यायालयीन परिसरात दिवसभर वातावरण शांत राहिले. वकिलांनी लाल फीती लावून कामकाज केल्याने न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

वकील संघाच्या माध्यमातून शासनाला लवकरात लवकर वकिलांना कायदेशीर संरक्षण देणारा ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर करून अंमलात आणावा, अशी एकमुखाने मागणी करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!