पाचोर्यात कॉग्रेस सोबत तहसील कचेरीत शेतकऱ्यांचा आक्रोश.!!!
पाचोरा प्रतिनिधी :-
पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अवकाळी पावसाने अनुदान अनेकांना मिळाले नाही, तर काहींचे पंचनामे झाले नाही चाळीसगाव तालुक्यातील बागायतदार शेतकरींना बागायतचे अनुदान मिळाले तर पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना जिरायचे पंचनामे करून अनुदान पासुन वंचित ठेवले आहे या विरोधात न्यायासाठी कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पुकारले आणि शेतकऱ्यांनासह तहसीलदार यांच्या दालनात आक्रोश व्यक्त केला..
या बाबत सविस्तर माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले होते तर काही गावांमध्ये घरामध्ये पाणी घुसून ग्रामस्थांचे नुकसान झाले तर शहरात काही भागात पावसाचे पाणी घरात शिरल्याने लोकांची संसार उघड्यावर पडले यावेळी स्थानिक आमदार यांनी मदतीची घोषणा केली, ओला दुष्काळ शासनाने जाहीर केला मात्र यात पूर्णपणे पंचनामे देखील व्यवस्थित झाले नाही तर अनेकांना अद्यापही अनुदान मिळाले नाही त्यातच शेजारच्या चाळीसगाव तालुक्यात बागायतदारांना बागायचे अनुदान मिळाले तर पाचोरा व भडगाव तालुक्यात बागायतदार शेतकऱ्यांना जिरायत दाखवून त्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले आहे या विरोधात काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसह थेट तहसीलदारांची भेट घेतली यावेळी तहसीलदार विजय बनसोडे यांना सविस्तर माहिती देऊन तात्काळ ज्यांच्या उताऱ्यावर विहीर आहे अशा शेतकऱ्यांना बागायताचे अनुदान तात्काळ मिळावे त्यासोबत पाचोरा शहरातील नागरिकांचे नुकसान झालेले आहेत त्यांना तात्काळ मिळावे डोंगरगाव येथील नुकसानग्रस्त ग्रामस्थांना प्रतिक कुटुंब एक लाख आमदारांनी जाहीर केले ते तात्काळ द्यावे या मागण्या करण्यात आल्या यावेळी तहसीलदार यांनी तात्काळ दखल घेऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश काढलेले असून अनुदानापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याची ग्वाही दिली आठ दिवसात जर कारवाई झाली नाही तर काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्यासह लाभार्थी शेतकरी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहे निवेदन देतांना गाळण भागातील शेतकरी ईश्वर पाटील, संतोष पाटील, आतिश पाटील, अविनाश पाटील, गोकुळ पाटील काँग्रेसचे जिल्हा सचिव प्रताप पाटील, सोशल मीडिया अध्यक्ष राहुल शिंदे, ओबीसी सेल चे चेतन बोदवडे, शुभम पाटील आदी उपस्थित होते.




Recent Comments