राज्यात आचारसंहिता लागू, अखेर निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा.!!!

0 331

राज्यात आचारसंहिता लागू, अखेर निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा.!!!

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर आता प्रतिक्षा संपली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसंदर्भात घोषणा करण्यात आली आहे.

मात्र या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील महापालिका निवडणुकीसंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, तर फक्त नगरपरिषद आणि नगर पंचायतीसंदर्भात ही घोषणा करण्यात आली आहे.

काय म्हणाले निवडणूक आयुक्त.?

ही पत्रकार परिषद नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसंदर्भात आहे. यावेळी निवडणुकीस पात्र असलेल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या माध्यमातून एकूण 6हजार 859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड होणार आहे. ज्या 246 नगर परिषदांमध्ये निवडणूक होणार आहे, त्यामध्ये दहा नवीन नगरपरिषदांचा समावेश आहे. तर दुसरीकडे 42 नगर पंचायतींसाठी निवडणूक होत आहे. यात 15 नवीन नगरपंचायतींचा समावेश आहे, तर अजून 105 नगर पंचायतीची मुदत संपलेली नाहीये.

निवडणुकीच्या महत्त्वाच्या तारखा

राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे. 17 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल तर 21 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल, त्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या नावाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, त्यानंतर दोन नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे, अशी घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे.

दरम्यान दुसरीकडे निवडणूक आयोग सरकारच्या दबावाखाली काम करते असा आरोप विरोधकांकडून सातत्यानं सुरू आहे, याला देखील निवडणूक आयोगाकडून यावेळी प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. दुबार तिबार मतदारांबाबत आम्ही काही प्रक्रिया केल्या आहेत.

निवडणूक आयोग कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही. आम्हाला मतदार यादी ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मिळते. दुबार तिबार मतदारांबाबत कारवाई करता येते. क्लेरिकल मिस्टेक दूर करत आहोत. प्रभाग चुकला असेल तर आम्ही दुरुस्त करत आहोत. विधानसभेच्या मतदार यादीत नाव आहे, पण या मतदार यादीत नाव नसेल तर तेही दुरुस्त करतो, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!