जळगावराजकीयसामाजिक

कजगाव येथे श्री विठ्ठल–रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व सभागृह भूमिपूजन सोहळा उत्साहात.!!!

कजगाव येथे श्री विठ्ठल–रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व सभागृह भूमिपूजन सोहळा उत्साहात.!!!

भडगाव ता.प्रतिनिधी : – आमीन पिंजारी

कजगाव (ता. भडगाव, जि. जळगाव) — कजगाव येथे दि. 21 फेब्रुवारी 2026 रोजी श्री विठ्ठल–रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व नाभिक समाजाच्या सभागृहाच्या भूमिपूजनाचा भव्य धार्मिक सोहळा भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यास नाभिक समाज बांधवांसह गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

या कार्यक्रमात पाचोरा–भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या शुभहस्ते सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी नाभिक समाजाच्या सभागृहासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले. समाजाच्या विकासासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संत सेना महाराज मंदिरात श्री विठ्ठल–रुक्मिणी यांच्या मूर्तीची विधिवत मंत्रोच्चारात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सोहळ्यानिमित्त दि. 20 फेब्रुवारी रोजी रात्री 9 ते 11 या वेळेत ह.भ.प. लक्ष्मण महाराज (ता. चोपडा, जि. जळगाव) यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर दि. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 10 या वेळेत ह.भ.प. सखाराम महाराज यांच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. कीर्तनामुळे संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले होते.

कार्यक्रमाच्या निमित्ताने नाभिक समाजाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ ग्रामस्थांसह भाविकांनी घेतला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नाभिक समाजातील पदाधिकारी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी जळगाव जिल्हा नाभिक समाजाचे माजी जिल्हाध्यक्ष बंटी भाऊ नेरपगार यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पवार (भडगाव) व रोहिदास वाघ (कजगाव) यांनी केले. उपस्थित मान्यवर व पाहुण्यांचे स्वागत नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आले.

या धार्मिक व सामाजिक उपक्रमामुळे कजगाव परिसरात उत्साहाचे व भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, गावाच्या सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले.

 

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!