
मदरसा रजा-ए-मुस्तफा येथे सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न.!!!
भडगाव प्रतिनिधी :- जावेद शेख
जालली मोहल्ला, भडगाव येथे असलेल्या मदरसा रजा-ए-मुस्तफा यांच्या वतीने सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नागरिकांचा व पालकवर्गाचा मोठा प्रतिसाद लाभला. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
कार्यक्रमात मदरशातील लहान विद्यार्थ्यांनी कुरआन शरीफ पठण, नात-ए-पाक, हदीस पठण, घुस्लचे फर्ज नमाज चे फ्राईज तसेच इस्लामिक अरकान व धार्मिक विषयांवरील सादरीकरणे सादर केली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण व प्रभावी सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक शिक्षणासोबत संस्कार रुजवण्याचा उद्देश साध्य झाल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजन मौलाना इरफान रजा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाला खलिक शेख, इसहाक मलिक, सलीम शेख,अख्तर मुल्ला,राजु हाजी साहेब नाजीम सर, मुजम्मील शेख सर, गणी बाबा, अशराफशेख,पत्रकार अबरार मिर्झा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हाजी जमालोद्दीन कासार यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना इसहाक साहेब होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना अझीम रजा, मौलाना सय्यद तारीख आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात मौलाना इसहाक साहेब यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले व अशा कार्यक्रमांमुळे धार्मिक ज्ञानाबरोबरच नैतिक मूल्ये जोपासली जात असल्याचे सांगितले. प्रमुख पाहुण्यांनी आयोजकांचे व शिक्षकवर्गाचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल जलाली मोहल्ला पंच कमेटी आयोजक मंडळाचे उपस्थितांनी अभिनंदन केले. शेवटी आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.



