जळगावसामाजिक

मिडिया पोलीस टाईम मध्ये शेख शरीफ शेख सलीम यांची,महाराष्ट्र राज्य विभागीय संपादकपदी नियुक्ती.

मिडिया पोलीस टाईम मध्ये शेख शरीफ शेख सलीम यांची,महाराष्ट्र राज्य विभागीय संपादकपदी नियुक्ती.

रावेर प्रतिनिधी :-

डिजिटल पत्रकारितेच्या विश्वात विश्वास, निर्भयता आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिडिया पोलीस टाईम या प्रभावी डिजिटल मीडियाने पत्रकारिता क्षेत्रात खळबळ उडवणारी महत्त्वपूर्ण नियुक्ती जाहीर केली आहे.

निर्भीड लेखन, अन्यायाविरुद्ध आक्रमक भूमिका आणि जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलेली पत्रकारिता अशी ठळक ओळख असलेले रावेर येथील पत्रकार श्री. शेख शरीफ शेख सलीम यांची महाराष्ट्र राज्य विभागीय संपादक या अत्यंत जबाबदारीच्या पदावर दि. 01 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीसाठी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.

सामाजिक अन्याय, अल्पसंख्यांकांचे प्रश्न, कायदा-सुव्यवस्थेतील त्रुटी तसेच प्रशासनाच्या अपयशावर थेट बोट ठेवणारे त्यांचे निर्भीड लेखन नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे. सत्तेसमोर न झुकणारी भूमिका, पोलिस व प्रशासनाला जाब विचारणारी पत्रकारिता आणि दबलेल्या समाजाच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याची भूमिका हीच त्यांच्या पत्रकारितेची ओळख आहे.

या नियुक्तीनंतर मिडिया पोलीस टाईमच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील जनतेचे ज्वलंत प्रश्न, पोलिस प्रशासनातील दुर्लक्षित बाबी आणि सामान्य नागरिकांवर होणारे अन्याय अधिक प्रभावी व आक्रमकपणे समोर येतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे.

पत्रकारिता वर्तुळात ही नियुक्ती “सिस्टमला हादरा देणारी” ठरणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असून, राज्यातील सत्ताधाऱ्यांसाठी ही एंट्री अस्वस्थ करणारी ठरेल, असेही बोलले जात आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!