श्री. क्षेञ मांडकी येथे श्री. संत बाळु मामा व मरगुबाई मंदिराचा दुसरा वर्धापन दिन. किर्तन सप्ताहाचे आयोजन. 
भडगाव प्रतिनिधी :—
तालुक्यातील मांडकी श्री. क्षेञ येथे गिरणा नदीच्या काठावर अन निसर्गरम्य स्थळी श्री. संत सदगुरु बाळुमामा मंदिर व मरगुबाई मंदिराचे लोकवर्गणीतुन बांधकाम करण्यात आले आहे. या मंदिराचा दुसरा वर्धापन दिन असुन किर्तन सप्ताहासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या किर्तन सप्ताहास दि. १० रोजी बुधवार पासुन ते दि. १३ रोजी शनिवार पर्यंत कार्यक्रम होणार आहेत. यात दि. १० रोजी राञी ९ वाजता हभप. आकाश महाराज उगले, दि. ११ रोजी हभप, साहील महाराज तळेगाव,
दि. १२ रोजी हभप. स्नेहल पाटील यांचे किर्तन तर दि. १३ रोजी सकाळी ९ वाजता हभप. योगेश महाराज धामणगाव यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. यानंतर दुपारी १२ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. महाप्रसादाची सेवा मुकेश हरिचंद्र चौधरी भुसावळ हे देणार आहे. तसेच सकाळी ७ वाजता बाळु मामांची आरती, सायंकाळी ६ वाजता हरीपाठ, राञी ९ वाजता बाळु मामांची आरती होणार आहे. दि. १२ रोजी सकाळी ८.३० वाजता होम, हवन पुजा होणार आहे. तरी दर्शनासह किर्तन, महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री. क्षेञ मांडकी येथील सेवेकरी, पुजारी, ग्रामस्थांमार्फत करण्यात आलेले आहे. किर्तन सप्ताहाचे हे दुसरे वर्ष आहे.
