उत्राण येथे श्री. वसंत हंकारे यांचे “न समजलेला देव माणूस बाप” या विषयावर प्रभावी जाहीर व्याख्यान.!!!
उत्राण येथे श्री. वसंत हंकारे यांचे “न समजलेला देव माणूस बाप” या विषयावर प्रभावी जाहीर व्याख्यान.!!!
एरंडोल ता. प्रतिनिधी :-
उत्राण (ता. एरंडोल) —मानवतेचा खरा अर्थ, श्रद्धा आणि नातेसंबंधातील बापाच्या स्थानाचे गूढ उलगडणारे “न समजलेला देव माणूस बाप” या विषयावरचे काळजाला भिडणारे दणदणीत जाहीर व्याख्यान सुप्रसिद्ध वक्ते श्री. वसंत हंकारे यांचे आयोजित करण्यात आले आहे.
हा प्रेरणादायी कार्यक्रम शुक्रवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७:०० वाजता विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, उत्राण (ता. एरंडोल) येथे पार पडणार आहे. या व्याख्यानात समाज, संस्कार, पालकत्व आणि मानवी मूल्यांविषयी सखोल विचारमंथन होणार असून, श्रोत्यांना भावनिक व बौद्धिक दोन्ही स्तरांवर समृद्ध करणारा अनुभव मिळेल, असा आयोजकांचा विश्वास आहे.
या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून श्री. भागवत दादा पाटील मित्र परिवार तसेच तळई-उत्राण जि.प. गटातील सर्व ग्रामस्थ मंडळी यांनी पुढाकार घेतला आहे.
कार्यक्रमाची संकल्पना विजय दादा पाटील, राजुभाऊ पवार, अमोल महाजन, प्रकाश कुवर आणि विलास महाजन या उत्साही युवकांनी मांडली असून, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
या संकल्पनेला श्री. भागवत भिकन पाटील, तालुकाध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, एरंडोल तालुका यांनी मार्गदर्शन केले आहे.
आयोजकांनी सर्व नागरिक, युवक व ज्येष्ठ मंडळींना या जाहीर व्याख्यानाला उपस्थित राहून “बाप” या शब्दामागील देवत्व आणि माणुसकीचा खरा अर्थ समजून घेण्याचे आवाहन केले आहे.