भडगाव नगरपरिषद निवडणूक : वॉर्ड क्रमांक 12 मध्ये मोहसीन खान यांना युवकांचा उत्स्फूर्त पाठिंबा.!!!
भडगाव ता.प्रतिनिधी :– आमीन पिंजारी,
भडगाव नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली असून, वॉर्ड क्रमांक 12 मध्ये महेक कलेक्शनचे संचालक आणि सामाजिक कार्यकर्ते मोहसीन खान यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारीची तयारी दर्शवली आहे. त्यांच्या उमेदवारीची चर्चा वॉर्डात चांगलीच रंगत असून, युवक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांचा त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.
मोहसीन खान यांनी आपल्या वॉर्डातील स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सोयी-सुविधांवर लक्ष केंद्रित करत विकास आराखडा तयार केला आहे.
“माझा उद्देश राजकारण नव्हे, तर लोकसेवा आहे. आश्वासनं न देता कृती करून दाखवण्यावर माझा विश्वास आहे,” असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
दरम्यान, मोहसीन खान हे सतत वॉर्डातील युवक व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेत आहेत आणि त्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे वॉर्ड क्रमांक 12 ला एक सक्षम आणि संवेदनशील प्रतिनिधी मिळेल, असा विश्वास स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.