मांडकी देवस्थानात संत बाळु मामांचा जन्मोत्सव साजरा.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
तालुक्यातील श्री क्षेञ मांडकी येथील श्री. संत सदगुरु बाळु मामा मंदिरात दि. ४ रोजी शनिवारी दुपारी ४.२३ वाजता श्री. संत बाळु मामा यांचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला .त्यानिमित्त विविध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते यादिवशी सकाळी ५ वाजता श्रींचा अभिषेक व पादयपुजन करण्यात आले. सकाळी ७.३० वाजता श्रींची आरती करण्यात आली. आणि दुपारी १ वाजेपासुन भजन संगीत संध्येचा सुरेल कार्यक्रम पार पडला. तसेच तळई येथील हभप. किर्तनकार मुक्ताबाई महाराज यांचा व ज्ञान गंगा प्रबोधीनी महिला भजनी मंडळ तळई कार्यक्रम पार पडला. त्यानंतर दुपारी ४.२३ वाजता संत बाळु मामांचा जन्मोत्सव पाळणा म्हणुन व पुष्प वर्षाव करुन व भंडारा उधळुन उत्साहात साजरा करण्यात आला. हभप. सुभाष चौधरी व सुवर्णा चौधरी या दोघांच्या हस्ते श्री. संत सदगुरु बाळु मामा यांच्या मुर्तीचे पुजन करुन जो बाळा जो जोरे जो असे म्हणत पाळणा हलविण्यात आला. त्यानंतर महाआरतीचा लाभ सर्व भाविकांनी घेतला. तर कण्यांचा प्रसादाचा लाभही भाविकांनी मोठया संख्येने घेतला. श्रींच्या जन्मोत्सवासह दर्शनाचा, कण्यांचा महाप्रसादाचा व विविध कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घेतला. या कार्यक्रमास मांडकी श्री. संत बाळु मामा देवस्थानावर परीसरातील भाविक भक्तांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.