एस.टी.मार्गाच्या वेळेत सुधारणा करा – अभाविप ची मागणी.!!!
पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा – कासोदा – पारोळा या मार्गावरील एस.टी.बसच्या वेळेत सातत्याने गोंधळ होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, त्या अनुषंगाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने पारोळा आगार व्यवस्थापकास निवेदन देत बसचा वेळेत योग्य ती सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
कासोदा – मालखेडा – धूळपिंप्री – चहुत्रे – मंगरूळ – मोरफळ – पारोळा ही बस अनेकदा वेळेवर येत नाही. कधी खूप लवकर तर कधी खूपच उशिराने ती येत असल्याने शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होत आहे.विद्यार्थी वेळेवर वर्गात पोहोचू शकत नाहीत,तर त्यांचा संपूर्ण दिवसाची गैरसोय होत असल्याची तक्रार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदकडे प्राप्त झाली होती.त्या अनुषंगाने सदर बस ही सकाळी ७ वाजता कासोदा येथे पोहोचावी आणि पुढे निश्चित वेळापत्रकानुसार प्रवास करावा,जेणेकरून विद्यार्थ्यांना वेळेवर शाळा, महाविद्यालयात पोहोचता येईल तसेच त्यांची गैरसोय थांबेल.
विद्यार्थ्यांमध्ये वाढणारा असंतोष व पालकांची चिंता लक्षात घेता, महामंडळाने याबाबत योग्य ती उपायोजना करून समस्येचे निराकरण करावे अन्यथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रशासनाला तीव्र रोषास सामोरे जावे लागेल,अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शहर मंत्री अंकित पवार, घनश्याम पाटील,मयूर पाटील यांनी पारोळा आगार व्यवस्थापक यांना दिले आहे.