फर्निचर दुरुस्तीच्या बहाण्याने घरात चोरी – पाचोरा पोलिसांची जलद कारवाई; आरोपीकडून सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत.!!!
फर्निचर दुरुस्तीच्या बहाण्याने घरात चोरी – पाचोरा पोलिसांची जलद कारवाई; आरोपीकडून सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत.!!!
पाचोरा प्रतिनिधी :-
पाचोरा शहरातील वृंदावन पार्क येथे दुपारी 12 ते 12.30 वाजेच्या सुमारास झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत पाचोरा पोलिसांनी अवघ्या काही तासांत सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून एकाला अटक करण्यात आली आहे.
अश्विनी राजेश डहाळे (रा. वृंदावन पार्क, पाचोरा) यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने ₹1,05,000/- किमतीचा सुमारे 11 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस व ₹1500/- रोख रक्कम चोरी केल्याची तक्रार पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. गुन्ह्याचा तपास पो. ह. गजानन देशमुख हे करत होते.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरून रमेशकुमार शामलाल जांगीड (वय 49, रा. इसाडिया, ता. मादपुर, जि. सिकर, राजस्थान; सध्या रा. एसबीआय कॉलनी, पाचोरा) याच्यावर संशय घेण्यात आला. रमेशकुमार हा डहाळे यांच्या घरी फर्निचर दुरुस्तीचं काम करत होता आणि गुन्हा घडल्यानंतर पसार झाला होता.
गुप्त बातमीदाराच्या मदतीने रमेशकुमारला ताब्यात घेऊन विश्वासात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्या ताब्यातून सदर सोन्याचा नेकलेस व रोख रक्कम मिळून एकूण ₹1,06,500/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा मुद्देमाल एस.बी.आय कॉलनीत बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी लपवून ठेवण्यात आला होता.
पोलिसांनी आरोपीला सायंकाळी 6.30 ते 7 च्या दरम्यान अटक केली असून त्याला माननीय न्यायालयात रिमांड रिपोर्टसह हजर करण्यात येणार आहे.
ही यशस्वी कारवाई पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पो. ह. गजानन देशमुख, पो. का. संदीप राजपूत, जितेश पाटील, हरीश परदेशी व कमलेश राजपूत यांच्या पथकाने पार पाडली.