शेतकरी हितासाठी जिल्हा बँकेविरोधातील लढा यशस्वी.आमदार किशोर आप्पा पाटील.!!!

0 33

शेतकरी हितासाठी जिल्हा बँकेविरोधातील लढा यशस्वी.आमदार किशोर आप्पा पाटील.!!!

पाचोरा प्रतिनिधी :-

जळगाव जिल्हा बँकेच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे अनेक विकास सोसायट्या अडचणीत येत होत्या. शेतकरी बांधव कर्जमाफीच्या आश्वासनांमुळे संभ्रमात होते—कर्ज भरावं का थांबवावं? ही अनिश्चितता आणि जिल्हा बँकेच्या धोरणामुळे विकास सोसायट्या ‘अनिष्ट तफावत’ मध्ये गेल्या.

मी स्वतः जिल्हा बँकेचे संचालक असूनही हा निर्णय थांबवू शकलो नाही, पण माझ्या मतदारसंघातील आणि संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून हा मुद्दा मी विधिमंडळात लक्षवेधी सूचनेद्वारे मांडला.

आदरनीय सहकार मंत्री श्री. बाबासाहेब देशमुख यांनी गंभीरतेने दखल घेतली आणि चार दिवसांत नाबार्ड, RBI, जिल्हा बँकेचे चेअरमन व इतर अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. त्या बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय झाले:

1. शेतकऱ्यांना थेट कर्ज न देता विकास सोसायटीमार्फतच कर्जपुरवठा करणे.

2. जिल्हा बाहेर शेतजमीन असलेल्या सभासद शेतकऱ्यांनाही कर्जमंजुरी देणे.

3. विकास सोसायट्यांना कमिशन देऊन सचिवांचे प्रलंबित पगार अदा करण्याचा मार्ग मोकळा करणे.

या निर्णयांमुळे शेतकरी बांधवांना मानसिक दिलासा मिळाला आहे. शेतकरी, विकास सोसायट्यांचे सदस्य आणि सचिव यांचंही आर्थिक भवितव्य अधिक सुरक्षित झालं आहे.

आज राज्यभरातून सचिव आणि शेतकरी बांधवांचे मला फोन येत आहेत. हे सर्व शक्य झालं ते फक्त सहकार मंत्री महोदयांच्या तात्काळ प्रतिसादामुळे. मी त्यांचा आणि सर्व सहकाऱ्यांचा मन:पूर्वक आभार मानतो.

शेतकऱ्यांच्या हितासाठी हा लढा पुढेही असाच सुरू राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!