तांदुळाची काळ्याबाजारात विक्री,रेशनिंग दुकानदारावर गुन्हा दाखल.!!!
पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा – बेकायदेशीर रेशनिंगच्या तांदळाची वाहतूक करत तो काळ्या बाजारात विकल्याप्रकरणी एका रेशनिंग दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वसंत पौलाद पवार रा. हिवरखेड़ा सिम (तांडा) असे रेशनिंग दुकानदाराचे नाव आहे.
दिनांक सहा रोजी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास तालुक्यातील मोंढाळे गावातील नाल्याचा पुलावर केलेल्या तपासणी दरम्यान वसंत पवार व त्याचे सहकारी अभिसींग रुपचंद राठोड हे वाहन एमएच १९ एआर २७१५ वरून दोन पिशव्यातील तीन हजाराच्या अंदाजे एक क्विंटल रेशनिंगच्या तांदुळ बेकायदेशीरित्या वाहतुक करतांना आढळुन आले. याबाबत पवार यांना सदर तांदुळ हा काळ्याबाजारात विकण्यासाठी होता असे विचारल्यावर त्यांनी जळगाव येथील एका लाभार्थ्याच्या घरी पोच करण्यासाठी आहे असे सांगितले,परंतू यासंबंधीत कोणतेही दस्तऐवज सादर केले नाही. याप्रकरणी पारोळा पुरवठा निरीक्षण अधिकारी शिवकुमार निरगुळे यांच्या फिर्यादीवरून आज पोलिसात वसंत पवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.