पारोळा ते कनाशी पायी दिंडी मार्गस्थ.!!!
पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा – प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही पारोळा ते कनाशी पायी दिंडी मार्गस्थ झाली आहे.
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र कनाशी येथे आज बुधवारी (ता.९) रात्री अकरा वाजता येथील बुधनाथ महाराज मठापासुन पायी दिंडी काढण्यात आली. या दिडिंला सन २००७ पासून सुरुवात झाली असून १९ वर्षांची परंपरा आहे.कनाशी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त श्री गोविंद प्रभू यांच्या दहाडचे विशेष वर्षातून एक वेळेस दर्शन होत असते.यानिमित्त जनसेवक पी जी पाटील यांच्या मार्गदर्शनात सदर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते.या दिंडी सोहळ्यास विशेष महत्त्व असल्याने ठिकठिकाणाहून दिंडीत बहुसंख्येने भाविक सहभागी होत असतात.
दरम्यान दिंडीत भाविकांना रस्त्यात मुक्या प्राण्यांपासून कोणताही त्रास जाणवू नये, यासाठी डीजेवर भक्तीगीताने मार्गक्रमण केले जाते.दिंडीत भक्तांसाठी ठिकठिकाणी नाश्त्याची व्यवस्था केली जाते.