बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न उधळला; दोघांना अटक.!!!

0 38

बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न उधळला; दोघांना अटक.!!!

जळगाव प्रतिनिधी :-

शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाजवळ बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईत तब्बल ₹८,००० किमतीच्या ५०० रुपयांच्या बनावट नोटा, एक दुचाकी आणि दोन मोबाईल फोन्स असा ₹३६,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी दोघांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

गुप्त माहितीवरून सापळा रचला

स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली होती की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य गेटजवळ दोन संशयित ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर पथकाने तत्काळ कारवाई करत रात्री १० वाजेच्या सुमारास सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेले संशयित आरोपी :

सचिन दरबारसिंग राजपूत (वय ३४, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव)सचिन संजय गोसावी (वय २३, रा. वाघ नगर, जळगाव) या दोघांना ताब्यात घेतले.

मुद्देमाल

बनावट नोटा : ₹८,००० (५०० रुपयांच्या १६ नोटा)

मोबाईल फोन्स : २

दुचाकी : MH 19 DU 7808

एकूण जप्ती : ₹३६,५००

या प्रकरणी स्थानीय गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी विजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!