भडगांव येथील माहेर वासिन पत्नीच्या अंगावर पतीचा चार चाकी वाहन चालवत जीव घेणा हल्ला; भडगांव पोलिस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल.!!!

0 1,462

पतीकडून पत्नीवर वाहन चालवत जीवघेणा हल्ला.भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.भडगांव येथील माहेर वासिन पत्नीच्या अंगावर पतीचा चार चाकी वाहन चालवत जीव घेणा हल्ला; भडगांव पोलिस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

१२ जून रोजी भडगाव शहरातील पेठ भागात एका पतीने आपल्या पत्नीवर टाटा नेक्सोन गाडी चालवत थेट जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. किरकोळ वाद विकोपाला गेल्यानंतर रेवण प्रमोद पवार

(रा. पाचोरा) याने पत्नी तृप्ती रेवण पवार

(वय ३२) यांच्यावर गाडी चढवली आणि नंतर गाडी रिव्हर्स घेऊन फरफटत नेले.या हल्ल्यात पीडित महिला गंभीर जखमी झाली असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. हल्ल्या आधी आरोपीने तृप्ती यांची बहिण प्रियदर्शनी हिला देखील मारहाण केली.

या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. २२१/२०२५ अन्वये IPC 2023 अंतर्गत कलम १०९, १९५८(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!