चक्री वादळ वारे मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई सह शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी.

0 299

चक्री वादळ वारे मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई सह शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी.

भडगांव प्रतिनिधी :-

तालुक्यात ११ जून रोजी चक्री वादळ वारांसह मुसळधार पावसामुळे नुकसानीचे पंचनामे करून त्वरित मदत मिळावी. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान द्यावे.

शेतकरी संघास ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट वाढवावे व सर्व नोंदणीधारक शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी करावी. संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान नेहमी उशिरा मिळते ते वेळेवर मिळावे व अनुदानात वाढ करावी. शेतकरी मालास योग्य तो हमी भाव मिळावा.

अशा आशयाचे निवेदन निर्मल सीडस संचालिका वैशाली सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनात शेतकरी संघ संचालिका योजना पाटील, युवासेना ता. प्रमुख चेतन पाटील सह मनिषा पाटील, चेतन पाटील, रोनित अहिरे, भूषण देवरे, भैय्या नरेंद्र राजपूत, सत्यजित पाटील, दत्तात्रय पाटील, कल्पेश महाजन, गणेश पाटील आदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवासी नायब तहसीलदार सुधीर सोनवणे यांना निवेदन देत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!