कासोदा येथील युवतीची आत्महत्या

0 502

कासोदा येथील युवतीची आत्महत्या

एरंडोल प्रतिनिधी :-

कासोदा गावालगत असलेल्या बांभोरी जवळील पांडे नगर येथील रहिवासी संजय धना शिवदे यांची पुतणी दिपाली अशोक शिवदे (19) ह्या युवतीने सोमवार रात्री अंदाजे रात्री दीड दोन वाजेच्या सुमारास राहत्या घरा जवळ बांभोरी शिवारात असलेल्या शैलेंद्र सोनार यांच्या शेतातील विहिरीत आत्महत्या केल्याची माहिती मिळाली.या बाबत दिपालीचे काका संजय शिवदे यांनी कासोदा पो. स्टे. मंगळवारी सकाळी साडे सात च्या सुमारास खबर दिली.त्या अनुषंगाने कासोदा पो.स्टे. ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दिपाली ने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजलेले नाही.या सर्व घटनेचा तपास कासोदा पो. स्टे. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनात कासोदा पो.स्टे.चे उपनिरीक्षक दत्तू खुळे करत असल्याचे समजते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!