महाराष्ट्रात ‘महावृष्टी’ ची शक्यता;मान्सून पूर्ण राज्य व्यापणार, ३१ मेपर्यंत मुसळधार.!!!

0 443

महाराष्ट्रात ‘महावृष्टी’ ची शक्यता;मान्सून पूर्ण राज्य व्यापणार, ३१ मेपर्यंत मुसळधार.!!!

पुणे :-

यंदाच्या जून ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून,’महावृष्टी’ चं खतरा असल्याचा इशारा दिला आहे. ३१ मेपर्यंत मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार असून, पुढील दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. हवामान विभागाने यंदा प्रथमच राज्यनिहाय आणि विभागनिहाय पावसाचे भाकीत जाहीर केले आहे.

मान्सून आज राज्य व्यापणार

मान्सून सोमवारी मुंबई, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांत दाखल झाल्याने मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रात मोठा पाऊस झाला. मंगळवारीही तो त्याच ठिकाणी मुक्कामी होता. बुधवारी तो राज्याचा उर्वरित भाग व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

… असे आहेत अलर्ट

ऑरेंज अलर्ट : रायगड (२८), रत्नागिरी (२८, २९), सिंधुदुर्ग (२८, २९), सातारा (घाट) (२८), भंडारा (२८), चंद्रपूर (२८), नागपूर (२८).

यलो अलर्ट : ठाणे (२८), मुंबई (२८), रायगड (२९), रत्नागिरी (२८, २९, ३१), सिंधुदुर्ग (३०, ३१), धुळे (२९), नंदुरबार (२९), जळगाव (२९, ३०), पुणे (घाट) (२९, ३०, ३१), कोल्हापूर (घाट) (२९, ३०), सातारा (घाट) (२९, ३०), छत्रपती संभाजीनगर (२९, ३०), जालना (२९, ३०), परभणी (२९, ३०), बीड (२९), हिंगोली (२९, ३०), नांदेड (२९, ३०), लातूर (२९), अकोला (२९, ३०), भंडारा (२९, ३०), बुलडाणा (२९, ३०, ३१), चंद्रपूर (२९, ३०), गडचिरोली (२९ ते ३१), गोंदिया (२९ ते ३१), नागपूर (२९ ते ३१), वर्धा (२९ ते ३१), वाशिम (२९, ३१), यवतमाळ (२९, ३०, ३१).

राज्यातील पावसाचे टक्केवारीचे अंदाज

कोकण: 107 टक्के

मध्य महाराष्ट्र: 110 टक्के

मराठवाडा: 112टक्के

विदर्भ: 109 टक्के

जून महिन्यात: 108-112 टक्के पावसाचा अंदाज

पावसामुळे शेतकऱ्यांची आणखी एक परीक्षा; ४१ हजार हेक्टर पीकहानी

राज्यात झालेल्या अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे ४०,९४९ हेक्टर क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. उन्हाळी हंगामातील भात, मूग, उडीद, मका, कांदा, टोमॅटो, केळी, संत्रा, आंबा यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सर्वाधिक नुकसान झालेली जिल्हे (हेक्टरमध्ये)

अमरावती: १२,५६५

बुलडाणा: ६,६९९

जळगाव: ४,५३८

नाशिक: ३,५२३

अहिल्यानगर: १,४४१

इतर जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणात हानी

पावसाची अशीच स्थिती राहिल्यास नुकसानीचा आकडा वाढण्याचा अंदाज कृषी आयुक्तालयातून वर्तविण्यात आला. उन्हाळी हंगामातील भात, मूग, उडीद, ज्वारी, तीळ, मका, भुईमूग, कांदा, भाजीपाला, टोमॅटो, कांदा-बटाटा, लिंबू, पपई, केळी, संत्रा, मोसंबी, आंब्याचे नुकसान झाले आहे. तसेच, अन्य फळबागांना हानी पोहोचली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!